TRENDING:

Mahashivratri 2025: महाशिवरात्री व्रत आणि पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त चुकवू नका!

Last Updated:

Mahashivratri 2025: दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान साजरा केला जातो. महादेवाच्या भाविकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो. देशभरामध्ये हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद-समृद्धी येते, असे मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक करुन महामृत्यूंजय मंत्राचा जप करुन शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे, यामुळे भगवान शंकराची कृपादृष्टी कायम राहते, असेही सांगितलं जाते. याबाबत पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिलीये.

advertisement

महाशिवरात्री कधी आहे?

दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11.08 वाजता होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 वाजता तिथी समाप्त होईल. या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे, रुद्राभिषेक आणि उपवास केल्यास शुभ फळ मिळते, असे सांगितले जाते.

advertisement

Mahashivratri 2025: शिवलिंगावर कोणती फुलं वाहावी? पाहा महाशिवरात्री मुहूर्त, व्रत आणि विधी

महाशिवरात्री 2025 निशिता काल पूजा मुहूर्त

महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काल पूजेचे विशेष महत्त्व आहे.  यंदा ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारीला मध्य रात्री 12:27 वाजेपासून ते मध्यरात्री 1:16 वाजेपर्यंत असणार आहे.

महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त

रात्रीच्या प्रथम प्रहराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:43 वाजेपासून ते रात्री 9:47 वाजेपर्यंत असणार आहे. रात्रीच्या द्वितीय प्रहराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:47 वाजेपासून ते मध्यरात्री (27 फेब्रुवारी 2025) 12:51 वाजेपर्यंत असणार आहे. रात्रीच्या तृतीय प्रहराच्या पूजेची वेळ 27 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री 12:51 वाजेपासून ते पहाटे 3:55 वाजेपर्यंत आहे. रात्रीच्या चतुर्थ प्रहराच्या पूजेची 27 फेब्रुवारी 2025 पहाटे 3:55 वाजेपासून ते संध्याकाळी 6:59 वाजेपर्यंत आहे.

advertisement

महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चनेचे आयोजन केले जाते. या दिवशी 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करावा. रात्रभर जागरण करुन शिव पुराणाचे पठण करतात. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास विशेष फळ मिळते, असे म्हणतात.

महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत कसे करावे?

महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करावे. संकल्प करुन व्रत करावे. सकाळी आणि संध्याकाळीही शंकर भगवान - पार्वती मातेची पूजा करावी. पूजेदरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीला वस्त्र अर्पित करणे शुभ मानले जाते. विवाहित महिलांसाठी या दिवस अतिशय महत्त्वाचा असतो, या दिवशी पार्वती मातेला संपूर्ण श्रृंगार सामग्री अर्पित करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली आहे

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2025: महाशिवरात्री व्रत आणि पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त चुकवू नका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल