अमावस्येला 'हे' दोन रंग टाळा; ओढवू शकते संकट…
ज्योतिषशास्त्रानुसार, अमावस्येला चंद्राचे अस्तित्व नसते, ज्यामुळे मनावर आणि वातावरणावर नकारात्मकतेचा प्रभाव लवकर पडू शकतो. अशा वेळी कपड्यांच्या रंगाचा आपल्या ऊर्जेवर मोठा परिणाम होतो. काळा रंग हा राहू आणि शनीचा प्रतीक मानला जातो. हा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. अमावस्येच्या दिवशी काळे कपडे घातल्याने मनामध्ये भीती, नैराश्य आणि चिडचिड वाढू शकते. बाहेरील बाधा किंवा 'दृष्ट' लागण्याची शक्यता काळ्या रंगामुळे अधिक वाढते. पांढरा रंग चंद्राचा आहे. अमावस्येला चंद्र क्षीण असतो, त्यामुळे पांढरे कपडे घातल्याने मानसिक दुर्बलता जाणवू शकते. तसेच, काही धार्मिक मान्यतांनुसार पांढरा रंग नकारात्मक शक्तींना लवकर आकर्षित करतो, म्हणून अमावस्येच्या रात्री पांढरे कपडे घालून निर्जन स्थळी जाणे टाळावे. शक्य असल्यास या दिवशी भगवा, पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत, जे सकारात्मकतेचे प्रतीक आहेत.
advertisement
या उपायाचे 6 सकारात्मक परिणाम
1. दृष्टबाधा दूर होते: जर तुमच्या कामाला कोणाची नजर लागली असेल किंवा घरात विनाकारण भांडणे होत असतील, तर हा उपाय ती नकारात्मकता शोषून घेतो.
2. आर्थिक बरकत: घराचा मुख्य प्रवेशद्वार हा 'लक्ष्मी'चा मार्ग मानला जातो. लिंबू-मिरचीमुळे अलक्ष्मी घराबाहेरच थांबते आणि घरात धनाची आवक वाढते.
3. व्यवसायात वृद्धी: जर तुमचे दुकान किंवा ऑफिस असेल, तर तिथेही हा उपाय केल्यास ग्राहकांची संख्या वाढते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात.
4. मानसिक शांतता: घरातील सदस्यांचे मन विचलित होणे थांबते आणि घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते.
5. शत्रू पीडा कमी होते: तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या लोकांचा प्रभाव कमी होतो आणि तुमचे शत्रू तुमच्यासमोर हतबल होतात.
6. आरोग्य रक्षण: घरातील लहान मुले वारंवार आजारी पडत असतील, तर या उपायामुळे त्यांना संरक्षणात्मक कवच मिळते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
