मौन आणि मंत्रजपाचे 'ते' 43 मिनिटं...
उद्या दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी एक विशेष मुहूर्त सुरू होत आहे जो 3 वाजेपर्यंत असेल. या 43 मिनिटांच्या कालावधीत 'ॐ गौरी शंकराय नमः' या मंत्राचा जप करण्याचे विशेष महत्त्व सांगितले जात आहे. मौनी अमावस्येला 'मौन' राहून केलेली साधना हजारो पटीने जास्त फळ देते. उद्याच्या या विशिष्ट वेळेत शांत राहून मनातल्या मनात मंत्रजप केल्यास शरीरातील ऊर्जा चक्रांचे संतुलन होते. ॐ गौरी शंकराय नम हा मंत्र शिव आणि शक्ती यांच्या एकरूपतेचे प्रतीक आहे. हा जप केल्याने केवळ वैवाहिक सुखच नाही, तर आर्थिक आणि मानसिक अडचणींतूनही कायमची सुटका मिळते, अशी मान्यता आहे.
advertisement
काय होईल या मंत्रजपामुळे?
1. संकटातून मुक्ती: जर तुम्ही या 43 मिनिटांत मौन राहून जप केलात, तर तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे मार्गी लागतील आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून तुमचे रक्षण होईल.
2. सुख-समृद्धी: 'गौरी-शंकर' हे गृहस्थाश्रमाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या मंत्रामुळे घरात लक्ष्मीचा वास स्थिर होतो आणि वर्षभर पैशांची चणचण भासत नाही. 3. कौटुंबिक शांतता: पती-पत्नीमधील वाद किंवा घरातील कटकटी दूर होऊन नात्यात गोडवा निर्माण होतो.
4. पितृदोषाचे निवारण: अमावस्येला केलेल्या या साधनेमुळे पितृ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
5. नकारात्मकतेचा नाश: घरामध्ये किंवा मनात असलेली भीती, नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा या मंत्राच्या लहरींनी नष्ट होते.
6. मानसिक बळ: वरील 43 मिनिटे स्वतःच्या मनावर ताबा मिळवून केलेली साधना तुम्हाला भविष्यातील संकटांशी लढण्यासाठी प्रचंड मानसिक शक्ती देते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
