TRENDING:

तुम्ही कधी स्वप्नात धावत्या घोड्याला पाहिलंय? या स्वप्नामागे दडलाय जबरदस्त अर्थ!

Last Updated:

स्वप्नात घोडा दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं, परंतु काहीवेळा घोडासुद्धा अडचणींचे संकेत देतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
मानवी जीवनात स्वप्नशास्त्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
मानवी जीवनात स्वप्नशास्त्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
advertisement

अयोध्या : झोपेत स्वप्न पडणं ही एक अत्यंत सामान्य घटना आहे. यापैकी काही स्वप्न आपल्याला जागेपणी आठवतही नाहीत, तर काही स्वप्न मात्र आपल्याला विचारात पाडतात. असं म्हणतात की, पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. आता हे कितपण खरंय माहित नाही पण स्वप्नशास्त्र सांगतं की, आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नामागे काहीना काहीतरी अर्थ दडलेला असतो. बरीच स्वप्न आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात. अगदी स्वप्नात एखादा प्राणी दिसला तर तोही काहीतरी संकेत असू शकतो. आज आपण स्वप्नात घोडा दिसण्यामागे नेमका काय अर्थ असतो हे जाणून घेणार आहोत.

advertisement

मूळातच धावत्या घोड्याला प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, मानवी जीवनात स्वप्नशास्त्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. काही स्वप्न आपल्यासाठी शुभ ठरतात, तर काही स्वप्न अशुभ असतात. स्वप्नात घोडा दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं, परंतु काहीवेळा घोडासुद्धा अडचणींचे संकेत देतो.

हेही वाचा : मोबाईलचा वॉलपेपर कसा असावा? सकाळी दिसणारा हा 1 फोटो ठरवतो नशीब!

advertisement

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात घोडा किंवा घोड्याचा फोटो दिसणं म्हणजे आपला चांगला काळ सुरू होणार असं मानलं जातं. जर स्वप्नात तुम्ही स्वतः घोड्यावर स्वार असाल तर याचा अर्थ होतो की, आता आपण जे कार्य हातात घ्याल त्यात आपल्याला यश मिळेल. म्हणजेच हा आपल्या प्रगतीचा संकेत असतो.

स्वप्नात जर आपण घोड्याला धावताना पाहिलं, तर हे स्वप्न सर्वोत्तम मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की, लवकरच आपला एक सुखद प्रवास होणार आहे. जर आपण स्वप्नात पंख असलेल्या घोड्याला हवेत उडताना पाहिलं, तर याचा अर्थ असतो की, लवकरच आपल्या घरात शुभ कार्य पार पडणार आहे.

advertisement

जर स्वप्नात एखाद्या जखमी किंवा आजारी घोड्याला पाहिलं, तर हा आपल्यासाठी सतर्क राहण्याचा इशारा असतो. असं म्हणतात की, हे स्वप्न पडल्यानंतर आपण नक्की कोणत्यातरी अडचणीत अडकणार आहात, त्यामुळे सावध राहावं.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
तुम्ही कधी स्वप्नात धावत्या घोड्याला पाहिलंय? या स्वप्नामागे दडलाय जबरदस्त अर्थ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल