बुरहानपूर, 14 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रोत्सवाला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या काळात सुख-समृद्धीसाठी लोक देवी दुर्गेची मनोभावे पूजा करतात. खरंतर घरोघरी देवीची मूर्ती स्थापन केली जात नाही, मात्र आता काही वर्षांपासून अनेकजण आपल्या घरी देवीचं उत्साहात स्वागत करतात. या स्थापनेबाबत ज्योतिषांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
पंडित संदीप भोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरी देवी दुर्गेची स्थापना करावयाची असल्यास तिची मनोभावे पूजा करावी. ज्यांच्याकडे देवीची स्थापना होणार नाही. त्यांनी देवीच्या फोटोसमोर दिवा लावून तिची पूजा करावी. ज्यामुळे आपल्या घरी सुख, शांती, समृद्धी नांदेल आणि घरातील सर्व अडचणी दूर होतील.
advertisement
नवरात्री लाभणार! बुध ग्रहाचा तूळप्रवेश सुख घेऊन येणार, यात आहे का तुमची रास?
पूजेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, भाविक ज्यापद्धतीने पूर्वीपासून देवीची पूजा करतात, त्याचपद्धतीने या काळातदेखील तिच्याकडे प्रार्थना करावी. दरम्यान, नवरात्रीत वास्तूदोष सहज दूर होतात. यासाठी 10 दिवस नियमितपणे देवीची पूजा करावी, असं ज्योतिषी सांगतात. आता उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 9 दिवस पूजेवेळी 9 रंगांचे कपडे परिधान करावे, जे देवीला समर्पित असतात.
Chandra Grahan 2023: कधी असेल सुतक? कोणत्या राशींसाठी ठरेल ग्रहण लाभदायक?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g