सप्तशृंगी देवी मंदिर नाशिकपासून 60 किमी अंतरावर आहे आणि भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.
मुंबा देवी मंदिर, मुंबई
मुंबईतील मुंबा देवी मंदिर हे शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर शहराच्या संरक्षक देवी मुंबाला समर्पित आहे, दुर्गा देवीचा हा स्थानिक अवतार मानला जातो.
advertisement
एकवीरा देवी मंदिर, लोणावळा
एकविरा आई मंदिर लोणावळ्याजवळ कार्ला लेणीजवळ आहे, आगरी-कोळी लोक मातेची पूजा करतात. हे मंदिर एका टेकडीच्या माथ्यावर सुमारे 500 पायऱ्या असलेले आणि कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे.
रेणुका देवी मंदिर, माहूर
माहूर हे रेणुका देवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. माहूरमध्ये अनुसया मंदिर आणि कालिका मंदिरासारखी इतर अनेक मंदिरे आहेत.
आज पितृ पक्षातील इंदिरा एकादशी! या शुभ मुहूर्तांवर करा पूजा, पहा व्रताची पद्धत
तुळजाभवानी मंदिर, सोलापूर
तुळजा भवानी मंदिर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, ते सोलापूरपासून 45 किमी अंतरावर आहे आणि 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. तुळजापूरमधील भवानी मंदिर सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या उतारावर यमुनाचल नावाच्या टेकडीवर आहे.
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला दक्षिण काशी असेही म्हणतात आणि ते भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. कोल्हापूरचे मंदिर श्री पीठम म्हणून देखील पूजनीय आहे. येथील समृद्धीची देवता महालक्ष्मी देवीला अंबाबाई देखील म्हणतात.
चतु:शृंगी मंदिर, पुणे
सेनापती बापट रोडवरील टेकडीच्या उतारावर असलेले चतु:शृंगी मंदिर हे पुणे शहरातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद असलेले चतु:शृंगी मंदिर शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
यंदा विजयादशमीला तयार होत आहेत 2 शुभ योग, जाणून घ्या त्यांचं महत्त्व
वज्रेश्वरी मंदिर, मुंबई
वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर मुंबईपासून 75 किमी अंतरावर आहे, ते वज्रेश्वरी देवीला समर्पित आहे. मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो, हिंदू देवींच्या उपासनेसाठी नवरात्र उत्सव आणि देवीच्या सन्मानार्थ मोठी जत्रा भरते.
मंधारदेवी काळूबाई मंदिर, सातारा
सातारा जिल्ह्यातील वाई भागात 4,650 फूट उंच डोंगरावर मंधारदेवी काळूबाई मंदिर आहे. हे मंदिर लोकप्रिय आहे आणि दरवर्षी जानेवारी महिन्यात काळूबाई जत्रा यात्रा भरते.