Vijayadashami 2023 : यंदा विजयादशमीला तयार होत आहेत 2 शुभ योग, जाणून घ्या त्यांचं महत्त्व
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
दसरा वृद्धी योग हा एक विशेष काळ असतो जेव्हा दसरा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार अधिक महिन्यात येतो. अधिक मास हा एक अतिरिक्त महिना आहे जो हिंदू कॅलेंडरमध्ये दर तीन वर्षांनी एकदा येतो.
हिंदू धर्मात, भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांचं विशेष महत्त्व आहे. यातलाच एक मोठा सण म्हणजे विजयादशमी होय. त्याला दसरा असंही म्हटलं जातं. हिंदू पंचांगानुसार अश्विन नवरात्रानंतरच्या दशमी तिथीला विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामांनी या दिवशी रावणाचा वध केला होता. रावणाने सीता मातेचं अपहरण केलं होतं आणि तिला रावणापासून मुक्त करण्यासाठी श्रीरामांनी लंकेवर हल्ला केला. या महायुद्धानंतर प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला, त्यामुळे हा दिवस धर्माच्या अधर्मावर विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
विजयादशमीला विविध विधी
विजयादशमीच्या दिवशी हिंदू धर्मात विविध प्रकारचे विधी केले जातात. या दिवशी भगवान राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि दुर्गामातेची पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते. या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते याला 'शस्त्र पूजन' म्हणतात.
शुभ कार्य सुरू करण्याची वेळ
विजयादशमी या सणाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्तही मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, नवीन कार्य सुरू करणं किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणं चांगलं मानलं जातं.
advertisement
विजयादशमीची तिथी
विजयादशमीची तारीख दरवर्षी बदलते. 2023 मध्ये, विजयादशमीची तिथी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:44 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:14 पर्यंत असेल. यंदा विजयादशमी 24 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. या दिवशी दोन शुभ योगही तयार होत आहेत.
विजयादशमीला शुभ योग
24 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:27 ते दुपारी 3:38 आणि 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:38 ते 6:28 या वेळेत रवी योग असेल. या शिवाय दसरा वृद्धी योग 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.40 वाजल्यापासून संपूर्ण रात्रीपर्यंत राहील.
advertisement
रवी योग
रवी योग ज्योतिषशास्त्रातील एक विशेष संयोग दर्शवतो, ज्यामध्ये सूर्य आणि चंद्र यांचं एकत्र संयोजन होतं. जेव्हा चंद्र एका विशिष्ट राशीत असतो आणि सूर्य दुसर्या विशिष्ट राशीत असतो तेव्हा रवी योग बनतो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या दिवशी रवी योग तयार होतो, त्या दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम यशस्वी होतं. विशेषत: लग्न, गृहप्रवेश, नोकरी, प्रवास इत्यादी शुभकार्यांसाठी हा योग निवडतात. त्यामुळे हिंदी ज्योतिषशास्त्रात रवियोगाचं महत्त्व खूप जास्त आहे, या संदर्भात 'झी न्यूज हिंदी'ने वृत्त दिलंय.
advertisement
दसरा वृद्धी योगया अधिक महिन्यात दसरा येतो तेव्हा त्याला 'दसरा वृद्धी योग' म्हणतात. भारतीय ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धांमध्ये याला खूप महत्त्व आहे. या वेळी केलेल्या पूजा आणि इतर कार्यक्रमांचे परिणाम दुप्पट होतात, अशी त्यामागची धारणा आहे. म्हणून, या वृद्धी योगाचा विशेष लाभ घेण्यासाठी लोक अधिक सावधगिरीने आणि भक्तिभावाने पूजा करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2023 7:11 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vijayadashami 2023 : यंदा विजयादशमीला तयार होत आहेत 2 शुभ योग, जाणून घ्या त्यांचं महत्त्व