पुणे : 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदीराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यादरम्यान, स्वामी रामभद्राचार्य यांच्या रामानंद मिशन विश्वस्त संस्थेने ‘अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड मधील कला शिक्षकाची अयोध्येतील 'अमृत महोत्सवा'च्या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी देशातील 20 चित्रकारांची लाईव्ह पेंटिंगसाठी निवड करण्यात आली आहे.
advertisement
कशी झाली निवड?
20 चित्रकारांमध्ये पिंपरी- चिंचवडच्या दिलीप माळी यांना देखील स्थान मिळाले आहे. ते गेली 20 वर्ष झालं चित्रकारिता करत आहेत. थेरगावच्या प्रेरणा शाळेत ते कला शिक्षक म्हणून कार्यरत देखील आहेत. अयोध्येत त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाल्याने दिलीप माळी हे खूप आनंदी असून ते भारावून गेले आहेत. त्यांनी हे श्रेय त्यांच्या आई आणि पत्नीला दिले आहे.
Ram Mandir: अयोध्येत बालरुपातील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना का होणार? हे आहे कारण
दिलीप माळी यांना चित्रकलेचा प्रदीर्घ अनुभव आहे. अयोध्येत त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी मिळाल्याने माळी यांनी आनंद व्यक्त केला आहे. याच श्रेय आई आणि पत्नीला दिले असून हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले, दिलीप माळी हे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. वाची आर्ट गॅलरी, मुंबई यांच्या चित्रकार निवड चाचणीतून कलाशिक्षक दिलीप माळी यांची निवड झाली.
Ram Mandir : ईस्ट इंडिया कंपनीचं 161 वर्ष जुनं नाणं; नाण्यावर श्रीरामांचा दरबार, पाहा Video
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते मंदिर परिसरात लाईव्ह पेंटिंग साकारणार आहेत. देशातील 20 चित्रकार श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा प्रत्येक्ष डोळ्याने अनुभवणार असून ते त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर रेखाटणार आहेत. खर तर हे खूप आव्हानात्मक असून त्याची उत्सुकता असल्याचं दिलीप माळी यांनी सांगितलं आहे.