Ram Mandir: अयोध्येत बालरुपातील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना का होणार? हे आहे कारण

Last Updated:

Ayodhya Ram Mandir: श्रीराम मंदिरात रामाची बालमूर्ती स्थापन केली जात आहे. या मूर्तीतल्या श्रीरामाचं वय पाचच वर्षं का आहे. अशा विशिष्ट वयाची मूर्तीच का बसवली जात आहे, याची उत्सुकता साहजिकच आहे.

News18
News18
नवी दिल्ली, 17 जानेवारी : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या वेळी मंदिराच्या गर्भगृहात पाच वर्षांच्या रामलल्लाचा 51 इंचाचा पुतळा स्थापित केला जाणार आहे. या मूर्तीचा रंग सावळा असेल. यात पाच वर्षांचा बालकाच्या स्वरुपातील श्रीराम कमळावर विराजमान होईल. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची आठ फूट असेल. आता पाच वर्षांच्या बालश्रीरामाची मूर्ती का स्थापन केली जात आहे, त्याचं वयोमान जास्त किंवा कमी का नाही, मूर्तीची उंची 51 इंचच का ठेवली गेली आहे, असे प्रश्न साहजिकच तुमच्या मनात आले असतील. 74 वर्षांपूर्वी बाबरी मशिदीच्या भग्न वास्तूत रामलल्लाची स्थापन केलेली धातुची मूर्ती कशी आणि किती मोठी होती, ती तिथं कशी आली हे आम्ही तुम्हाला सांगूच; पण सध्याची मूर्ती कशी घडवली गेली आहे हेसुद्धा सांगणार आहोत.
सर्व प्रथम हे जाणून घेऊया की, श्रीराम मंदिरात रामाची बालमूर्ती स्थापन केली जात आहे. या मूर्तीतल्या श्रीरामाचं वय पाचच वर्षं का आहे. अशा विशिष्ट वयाची मूर्तीच का बसवली जात आहे, याची उत्सुकता साहजिकच आहे. हिंदू धर्मात बालपण हे साधारणतः पाच वर्षं वयापर्यंत मानलं जातं. त्यानंतर मूल सुबुद्ध मानलं जातं.
पाच वर्षांच्या मुलाला बाल का मानतात?
चाणक्य तसंच अनेक विद्वानांच्या मते, पाच वर्ष वयापर्यंत मुलाची प्रत्येक चूक माफ केली जाते. कारण ते समजूतदार नसतं. या वयापर्यंत केवळ त्याला शिकवण्याचं काम केलं जातं. चाणक्य नीतिमध्ये या वयोगटातील मुलांच्या अगम्यता आणि सुगमता या संदर्भात अशा प्रकारे चर्चा केली गेली आहे.
advertisement
``पाँच वर्ष लौं लालिये, दस सौं ताडन देइ । सुतहीं सोलह बरस में, मित्र सरसि गनि लेइ ।।``
आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये देव आणि महान व्यक्तींच्या बाललीलांचा आनंद त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जास्त आला आहे. पाच वर्षांच्या श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासंबंधीचे काकभूशुंडीचे श्लोक अतिशय समयोचित आणि अचूक आहेत.
काकभूशुंडी म्हणतात,
तब तब अवधपुरी मैं जाऊं । बालचरित बिलोकि हरषाऊं ।।
advertisement
जन्म महोत्सव देखउं जाइ । बरष पांच तहं रहउं लोभाई ।।
याचा अर्थ असा आहे की मी अयोध्यानगरीत जेव्हाजेव्हा जातो तेव्हा त्यांच्या बाललीला पाहून आनंदी होतो. तिथं गेल्यावर मी जन्मसोहळा पाहतो (देवाच्या बाललीला) आणि या लीलांच्या मोहापायी पाच वर्ष तिथंच राहतो.
advertisement
काकभूशुंडी श्रीरामाच्या बाल रूपाविषयी अजून बरंच काही सांगतात. त्यानंतर रामलल्लाचं बालरुप पटकन फुलून येतं. श्रीरामाची बाल्यावस्थेतील मूर्ती अयोध्येच्या राम मंदिरात बसवणं योग्य असल्याचं त्यात म्हटलं आहे.
इष्टदेव मम बालक रामा । सोभा बपुष कोटि सत कामा ।।
निज प्रभु बदन निहारि निहारी । लोचन सुफल करउं उरगारी ।।
याचा अर्थ असा की बालरुपातले श्रीराम माझी इष्ट देवता आहेत. ज्यांच्या अंगात अब्जावधी कामदेवांचं सौंदर्य आहे. हे श्री गरूड, माझ्या परमेश्वराचं दर्शन करून मी माझ्या डोळ्यांचं पारणं फेडतो.
advertisement
काकभूशुंडी कोण होते?
काकभूशुंडी हे भूशुंडी म्हणूनही ओळखले जातात. ते एक निस्सीम श्रीराम भक्त असून, कावळ्याच्या रुपात गरुडाला रामायण कथा ऐकवतात. ते चिरंजीव आहेत. त्यांचे पृथ्वीवर अजूनही अस्तित्त्व आहे असं मानलं जातं.
काकभूशुंडी हे मूळचे अयोध्येतील शुद्र वर्गातले होते. एकदा भगवान शंकरानं क्रोधात त्यांना साप बनण्याचा शाप दिला. त्यानंतर त्यांनी क्षमा मागितल्यावर भगवान शंकराने त्यांची शिक्षा कमी केली आणि अनेक जन्मानंतर तू ब्राम्हण कुटुंबात काकभूशुंडी म्हणून जन्म घेशील आणि रामभक्त होशील, असं सांगितलं. पण नंतर आणखी एका शापामुळे ते कावळा बनले.
advertisement
श्रीरामाच्या बाललीला
काकभूशुंडींनी अयोध्येत सातत्याने श्रीरामाला बालरुपातच पाहिलं आणि त्यावर बरंच कथन केलं. प्रभू श्रीरामाने त्याच्या आयुष्यात फार कमी चमत्कार केले. पण लहानपणी त्यांनी त्यांच्या आई कौसल्येला आपल्या मुखातून विश्वदर्शन घडवलं होतं. यानंतर दुसरा विलक्षण चमत्कार म्हणजे सीतास्वयंवरावेळी शिवधनुष्य मोडणं. या व्यतिरिक्त ते आयुष्यभर मनुष्यरुपात वावरले.
advertisement
मूर्ती 51 इंचाचीच का?
भारतात आजकाल पाच वर्षांच्या मुलांची उंची सामान्यपणे 43 ते 45 इंचाच्या आसपास असते. पण श्रीरामांचा जन्म ज्या काळात झाला, त्यावेळी सामान्य लोकांची सरासरी उंची जास्त होती. त्यानुसार 51 हा शुभ अंक मानून मूर्ती 51 इंच उंचीची तयार केली गेली आहे.
काळा पाषाणच का?
मूर्ती काळ्या पाषाणाचीच का असा एक प्रश्न विचारला जात आहे. रामलल्लाची मूर्ती शाळिग्राम पाषाणात घडवली आहे. सामान्यपणे हिंदूधर्मात देव-देवतांच्या मूर्ती या पाषाणातून घडवल्या जातात. हा दगड अत्यंत पवित्र मानला जातो. शाळिग्रामाचा रंग काळा असतो. तो गुळगुळीत आणि अंडाकृती असतो. धर्मग्रंथांनुसार, शाळिग्राम भगवान विष्णूचं दुसरं रुप आहे. हा एक जीवाश्म पाषाण आहे. शाळिग्राम हा सामान्यपणे पवित्र नदी किंवा तळं अथवा किनाऱ्यावरून घेतला जातो.
74 वर्षांपूर्वी एवढी मोठी मूर्ती ठेवली गेली होती
74 वर्षांपूर्वी जेव्हा बाबरीच्या भग्न वास्तूत रामलल्लांची मूर्ती ठेवली गेली होती तेव्हा ती नऊ इंचाची आणि अष्टधातूची होती. 1949 साली पहिल्यांदा बाबरी मशीद उदध्वस्त झाल्यावर रामलल्लाची मूर्ती प्रकटली होती.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir: अयोध्येत बालरुपातील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना का होणार? हे आहे कारण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement