Mahashivratri 2024: यंदाची महाशिवरात्री कधी? सर्वार्थ सिद्धीसह 3 शुभ योग, रात्री 4 प्रहर पूजा मुहूर्त-विधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mahashivratri 2024: ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्री कोणत्या दिवशी आहे? महाशिवरात्रीला कोणते शुभ योग तयार होत आहेत? महाशिवरात्रीच्या 4 प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता? याविषयी जाणून घेऊ.
मुंबई, 17 जानेवारी : हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा पवित्र सण फाल्गुन कृष्ण चतुर्दशी या तिथीला येतो. यावर्षी 2024 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीसह 3 शुभ योग तयार होणार आहेत. त्या दिवशी श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्र असतील. भगवान भोलेनाथांचे भक्त महाशिवरात्रीला उपवास करून विधीपूर्वक महादेवाची पूजा करतात. त्या दिवशी तुम्ही कधीही पूजा करू शकता, परंतु महाशिवरात्रीला 4 प्रहरातील पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्यासाठी शुभ मुहूर्त पाळावा लागतो. ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्री कोणत्या दिवशी आहे? महाशिवरात्रीला कोणते शुभ योग तयार होत आहेत? महाशिवरात्रीच्या 4 प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता? याविषयी जाणून घेऊ.
महाशिवरात्री 2024 कधी आहे?
महाशिवरात्रीसाठी यावर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी शुक्रवार, 8 मार्च रोजी रात्री 09:57 पासून सुरू होईल आणि ही तिथी शनिवार, 9 मार्च रोजी संध्याकाळी 06:17 पर्यंत राहील. पूजेसाठी रात्रीच्या वेळेनुसार महाशिवरात्री शुक्रवार 08 मार्च रोजी आहे.
महाशिवरात्रीचा पूजा मुहूर्त?
महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 12:07 ते 12:56 पर्यंत आहे. पण, ज्यांना रात्रीची पूजा करायची नाही, ते ब्रह्म मुहूर्तापासून दिवसभरात कधीही पूजा करू शकतात. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 05:01 ते 05:50 पर्यंत मानला जाईल.
advertisement
महाशिवरात्री 2024 चार प्रहर पूजा मुहूर्त -
1. महाशिवरात्रीच्या रात्री पहिला प्रहर पूजा मुहूर्त
06:25 PM ते 09:28 PM
2. महाशिवरात्रीच्या रात्री दुसरा प्रहर पूजा मुहूर्त
09:28 PM ते 12:31 AM
3. महाशिवरात्रीच्या रात्री तिसरा प्रहर पूजा मुहूर्त
09 मार्च सकाळी 12:31 ते 03:34 पर्यंत
4. महाशिवरात्रीच्या रात्री चतुर्थ प्रहर पूजा शुभ मुहूर्त
advertisement
09 मार्च 03:34 AM ते 06:37 AM पर्यंत
महाशिवरात्री 2024 सर्वार्थ सिद्धीसह 3 शुभ योगांमध्ये -
महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, शिव आणि सिद्धी योग निर्माण होत आहेत. त्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 06:38 ते 10:41 पर्यंत आहे. तर 09 मार्च रोजी सकाळी 12:46 वाजेपर्यंत शिवयोग आहे. सिद्ध योग सकाळपासून तयार होत आहे. शिवयोग अध्यात्मासाठी चांगला मानला जातो, तर सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य यशस्वी ठरते. श्रावण नक्षत्र हे पहाटेपासून ते सकाळी 10:41 पर्यंत असेल त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होईल.
advertisement
महाशिवरात्री व्रत 2024 उपवास कधी सोडायचा?
शनिवारी 09 मार्च रोजी महाशिवरात्री व्रताची सांगता होणार आहे. उपवास सोडण्याची योग्य वेळ सकाळी 06:37 ते दुपारी 03:29 पर्यंत आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही उपवास सोडू शकता.
महाशिवरात्रीचे महत्त्व -
धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची भेट झाली होती. त्या दिवशी दोघांचे लग्न झाले. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव भौतिक स्वरूपात म्हणजेच दिव्य ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 17, 2024 8:58 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2024: यंदाची महाशिवरात्री कधी? सर्वार्थ सिद्धीसह 3 शुभ योग, रात्री 4 प्रहर पूजा मुहूर्त-विधी