मार्कंडेय पुराणातील माहितीनुसार पितृपक्षात यमलोकातून आपले पितर अर्थात आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबाच्या गृही वास्तव्यास येतात. आपल्या मृत नातवाईकाचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे.आपल्या पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि पितर संतुष्ट होतील, अशी कृत्ये करणे हे त्यांच्या वंशजांचे कर्तव्य आहे.
पितृपक्षात कावळा अशा पद्धतीनं देतो शुभ-अशुभ संकेत, पूर्वज अतृप्त असतील तर..?
advertisement
या संदर्भातील आदेश उपनिषदांमध्ये देखील सांगण्यात आले आहेत, जर आपणास पूर्ण श्राध्दकर्म शक्य नसेल तर आपण पितरांच्या नावे तर्पण तरी करणे गरजेचे आहे. यावेळी पितरांची नावे घेऊन पुजारी/भटजींच्या साहाय्याने पाणी सोडत हे तर्पण केले जाते, अशी माहिती पुरोहित संदिप दादर्णे यांनी दिली आहे.
ज्यांना आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झालेली तिथी माहीत असून त्या तिथीला आपण श्राद्ध करु शकत असू, तर पितृपक्ष पंधरवड्यात करून घ्यावे जर श्राद्ध कर्म करणे शक्य नसेल तर त्यासाठीचे उपाय पुरोहित कृष्णात गुरव यांनी सांगितले आहेत.
श्राद्ध करता येत नसेल तर काय करावं?
1) पितृपक्ष पंधरवड्यात श्राद्ध करता येत नसल्यास आपण आपल्या पितरांच्या श्राध्दतिथीला कावळ्याला नैवेद्य दाखवू शकतो.
2) गायीला आपल्या हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. तिच्या पोटात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असे मानले जाते. या गायीला चारा खायला घालणे आणि नैवेद्य देणे, हा उपाय देखील आपण करू शकतो.
3) पितरांच्या नावे गरजू व्यक्तीला, ब्राम्हणाला अन्नदान करणे हे एक पुण्यकर्म आहे. यामुळे देखील आपल्या पितर तृप्त होतात.
एकादशी, अनंत चतुर्दशी, पितृपक्ष सुरुवात; शेवटच्या आठवड्यात भरगच्च व्रत-उपवास
4) पिंपळाला जल अर्पण करणे देखील यावरील एक उपाय आहे. मात्र हे पाणी काळे तीळमिश्रित असणे गरजेचे आहे.
5) पाण्यामध्ये काळे तीळ तीळ अर्पण केल्याने देखील पितर संतुष्ट होतात.
या प्रकारची पुण्यकार्य केल्यास आपले पितर तृप्त होतात. त्यांचे शुभाशीर्वाद आपल्या पाठीशी राहतात. त्याचबरोबर सध्या असणाऱ्या योनीतून पुढील योनीत जाण्यास आपल्या पितरांना गती प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्या संतुष्टीसाठी आपण श्राध्दकर्म किंवा या गोष्टी करणे गरजेचे आहे. असेही पुरोहित कृष्णात गुरव यांनी स्पष्ट केले आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)