चमोली : ग्रहण ही खगोलशास्त्रातली एक सामान्य घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याचा प्रभाव अत्यंत गडद असतो. असं म्हणतात की, जेव्हा पौर्णिमेच्या रात्री राहू आणि केतू चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चंद्राला ग्रहण लागतं.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिषी डॉक्टर प्रदीप सेमवाल यांनी चंद्रग्रहणादरम्यान गरोदर महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच या ग्रहणाचा 3 राशींवर प्रचंड नकारात्मक प्रभाव पडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
advertisement
हेही वाचा : Holi 2024: बिनधास्त खेळा रंग, त्वचा आणि केस होणार नाहीत खराब! वापरा ही ट्रिक
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, फाल्गुन मासाच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला, सोमवारी 25 मार्च 2024 रोजी कन्या राशीत चंद्रग्रहण सुरू होईल. वर्षातल्या या पहिल्या ग्रहणाला सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सुरूवात होईल आणि दुपारी 03 वाजून 02 मिनिटांनी ग्रहण संपेल. म्हणजेच 04 तास 36 मिनिटांचं ग्रहण असेल. भारतातून हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे इथं त्याचा सूतक काळ लागू होणार नाही. अमेरिका, जपान, रशियाचा काही भाग, आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगल, इटली, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, दक्षिण नॉर्वे आणि स्वित्झर्लंडमधून हे ग्रहण पाहता येईल.
हेही वाचा : आज त्रास होईल, होळीनंतर नशीब बदलेल! 4 राशींचा फायदाच फायदा
गरोदर महिलांसाठी सूचना:
ज्योतिषांनी सांगितलं की, चंद्रग्रहणादरम्यान गरोदर महिलांनी घरातच थांबावं. नाहीतर ग्रहणाचा नकारात्मक परिणाम बाळावर होऊ शकतो. ग्रहणादरम्यान कैची, चाकू अशा कोणत्याही धारदार वस्तूंचा वापर करू नये. खिडक्या मोठ्या पडद्यांनी झाकून घ्या. जेणेकरून ग्रहणाची नकारात्मक किरणं घरात येणार नाहीत.
चंद्रग्रहणाचा 3 राशींवर विपरीत परिणाम:
ज्योतिषी प्रदिप सेमवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रग्रहणाच्या दिवशी 3 राशींच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्या राशी आहेत मिथुन, सिंह आणि वृश्चिक.
मिथुन : चंद्रग्रहणाच्या प्रभावाने आपल्याला धूलिवंदनाच्या दिवशी थकल्यासारखं वाटेल, काहीसा तणाव जाणवेल. नोकरीसंबंधित निर्णय घेताना सतर्क राहा. व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळतील. त्यामुळे कोणतीही रिस्क घेऊ नका. जोडीदारापासून काहीही लपवू नका.
सिंह : आपल्याला विविध अडचणींचा सामना करावा लागेल. विशेषत: शत्रूंपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत दबाव येईल. प्रेमसंबंधांमध्ये अडचणी सोसाव्या लागतील.
वृश्चिक : आपल्यासाठी चंद्रग्रहणाचा कालावधी धोक्याचा आहे. नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल. यश मिळवण्यासाठी दृढ निश्चय करणं आवश्यक आहे. जास्त चिडचिड करू नये, भांडणांपासून दूर राहावं, वाहन चालवताना काळजी घ्या, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा