देवघर : वर्षभरात 12 शिवरात्री असतात, त्यांना ज्योतिषशास्त्रात महत्त्व आहेच. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा 8 मार्चला महाशिवरात्री साजरी होईल. तेव्हा ग्रह स्थितीतून विविध योग निर्माण होणार आहेत. ज्यातून काही राशींच्या व्यक्तींना विशेष फायदा मिळेल. त्यांच्या हक्काचं सुख आता वाट्याला येईल.
झारखंडमधील देवघरच्या प्रसिद्ध ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, 250 वर्षांनंतर यंदाच्या महाशिवरात्रीला प्रदोष व्रतासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योग निर्माण होतोय. शिवाय शिवयोग आणि श्रवण नक्षत्र असल्याने चार राशींच्या व्यक्तींना महादेवांचा भरपूर आशीर्वाद मिळेल. तशी महादेवांची कृपा आपल्या भक्तांवर कायमच असते, परंतु ही महाशिवरात्री 4 राशींच्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने पावणार, असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्यासाठी त्यांना काही उपाय करणं आवश्यक आहे. या राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांनी काय उपाय करणं गरजेचं आहे, पाहूया.
advertisement
'या' 3 राशींचीच महाशिवरात्री! महादेवांचा आशीर्वाद मिळणार, 300 वर्षांनी आला योग
मेष : या राशीच्या व्यक्तींनी यंदा महाशिवरात्रीला शिवलिंगावर जल आणि तीन पानांचं बेलपत्र अर्पण करावं. या दिवशी ग्रह, नक्षत्र आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे आपल्याला महादेवांचा भरपूर आशीर्वाद मिळेल.
मिथुन : आपणही महाशिवरात्रीला शिवलिंगावर जल अर्पण करणं लाभदायी ठरेल. शिवाय कन्हेर फूलही अर्पण करावं. ज्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होतील.
कर्क : आपण या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करावं. शिवाय दुर्वा आणि तांदूळही वाहावे. त्यामुळे महादेवांची कृपा आपल्यावर सदैव राहील.
सिंह : आपण या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावं. मग दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर दही आणि मग 11 वेळा देवाचं नामस्मरण करत बेलपत्र वाहावं. यामुळे आपल्या आयुष्यातली सर्व संकटं दूर होतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
