संकष्टी चतुर्थी 2025 तिथी, शुभ मुहूर्त -
वैदिक कॅलेंडरनुसार, दर महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी संकष्टी साजरी केली जाईल. चतुर्थी तिथी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११:५२ वाजता सुरू होईल आणि ही तिथी १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ०२:१५ वाजता संपेल.
advertisement
मोदकाचा नैवेद्य - श्री गणेशाला मोदक खूप आवडतात, हे आपल्याला माहीत असेलच. असे मानले जाते की, मोदक अर्पण केल्याने श्री गणेश लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
अनपेक्षित आर्थिक लाभाचे योग! या मूलांकासाठी वेळ परफेक्ट; शनिदेव भरभरून देणार
लाडूचा प्रसाद - गणपती बाप्पांना बुंदीचे लाडू खूप प्रिय मानले जातात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रसादामध्ये बुंदीचे लाडू अर्पण केल्याने गणपतीचे आशीर्वाद राहतात, ज्यामुळे घरात आणि कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते.
फळे आणि नारळ अर्पण करणे - गणपतीला नारळ, दूध, दही आणि ताजी फळे अर्पण करणे शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या पूजेनंतर या गोष्टी अर्पण केल्यास तर जीवनातील अडचणी दूर होतात आणि शुभफळ मिळते, असे मानले जाते.
धनू, मकर, कुंभ, मीन साप्ताहिक राशीभविष्य; आठवड्यात सगळीकडून आनंदी-आनंद
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
