Numerology: अनपेक्षित आर्थिक लाभाचे योग! या मूलांकासाठी वेळ परफेक्ट; शनिदेव भरभरून देणार
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 फेब्रुवारी 2025चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस पर्फेक्ट आहे. नियोजित सर्व कामं आज पूर्ण होतील. आजचा दिवस बिझनेस क्लाससाठीही चांगला आहे. कोणाशी तरी बिझनेसमध्ये भागीदारी करायची असेल, तर आजचा दिवस उत्तम आहे. ही भागीदारी भविष्यात पैसे मिळण्याची शक्यता निर्माण करील. आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्या सर्वसाधारण आहे. आजचा दिवस जोडीदारासह सुखद असेल. आजचा दिवस पैशांच्या दृष्टीने अनुकूल असेल. आज पैसे मिळवण्याचे नवे मार्ग खुले होत असल्याचं दिसेल.
advertisement
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खूप आनंदी व्हाल. प्रगतीसाठी विचारपूर्वक निर्णय घेणं फायद्याचं ठरेल. आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्या चांगला असेल. आजचा दिवस जोडीदारासह प्रेमाचा असेल.
advertisement
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस चांगला आहे. आजचा दिवस खूप बुद्धिचातुर्याने व्यतीत कराल. आर्थिकदृष्ट्या अनुकूल दिवस आहे. आज आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज अचानक कुठून तरी पैसे मिळतील. आजचा दिवस कुटुंबीयांसमवेत प्रेमाचा असेल. आजचा दिवस जोडीदारासह प्रेमाच्या वातावरणात व्यतीत होईल. आज जोडीदारासह कुठे तरी बाहेर जाण्याचं नियोजन कराल.
advertisement
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस सर्वसाधारणपेक्षा कमी आहे. आज विनाकारण कामात अडथळे येतील. आज तुमची आणि वडिलांची तब्येत थोडी बिघडू शकते. हृदयाशी निगडित समस्येमुळे चिंता वाटू शकते. आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्या सर्वसाधारण आहे. आजचा दिवस जोडीदारासह सर्वसाधारण आहे.
advertisement
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस चांगला असेल. आजचा दिवस बिझनेसच्या दृष्टीने उत्तम असेल. आज तुम्ही कामं अत्यंत हुशारीने पूर्ण कराल. ते नजीकच्या भविष्यकाळात तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरेल. आजचा दिवस पैशांच्या दृष्टीने अनुकूल आहे. आज कुटुंबीयांकडून खूप प्रेम आणि पाठबळ मिळेल. आजचा दिवस जोडीदारासह आनंदाचा असेल.
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस सर्वसाधारण असेल. आज कशाची तरी काळजी वाटेल. आज पैसे गुंतवण्याचा विचार कराल. कौटुंबिकदृष्ट्या चांगला दिवस आहे. आज कुटुंबीयांसह मनोरंजनाचा कार्यक्रम आखाल. आज जोडीदाराशी वाद होऊ शकतो. त्यामुळे शांत राहा आणि रागावू नका.
advertisement
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस सर्वसाधारण आहे. आज कामात अडथळे येतील. दिवसाच्या सुरुवातीला तुमचे विचार सकारात्मक असतील; मात्र ते दिवसभर तसेच राखणं जमणार नाही. आज थोडे उद्धटासारखे वागाल. आज कामाच्या ठिकाणी कोणाशी तरी वाद होईल. त्यामुळे आज संयमाने काम करा आणि विनाकारण बोलायला जाऊ नका. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारण आहे. आज पैसे शहाणपणाने वापरा. आज कुटुंबीय आणि जोडीदारासह आनंदात दिवस व्यतीत कराल.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस सर्वसाधारण आहे. आज कुटुंबातल्या अंतर्गत बाबींनी विचलित होऊ शकता. त्यामुळे आज मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारण असेल. आज घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेऊनच पैसे गुंतवा. त्यामुळे त्यातून आर्थिक लाभाची शक्यता तयार होईल. आज कुटुंबीयांशी वैचारिक मतभेद होतील. आज जोडीदाराशी समन्वयही चांगला नसेल.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस उत्तम असेल. आज सकारात्मक विचाराने सारी कामं पूर्ण कराल. आज ऊर्जावान वाटेल. आज राग नियंत्रित करावा लागेल. विनाकारण रागामुळे कामं बिघडतील. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिकदृष्ट्या सर्वसाधारण दिवस असेल. आज कुटुंबीयांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. आज जोडीदार एखाद्या मुद्द्यावरून तुमच्यावर रागावेल. शांत राहा, रागावू नका.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 15, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: अनपेक्षित आर्थिक लाभाचे योग! या मूलांकासाठी वेळ परफेक्ट; शनिदेव भरभरून देणार


