Weekly Rashi Bhavishya In Marathi: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य; चांगली ऑफर-प्रमोशनचीही शक्यता

Last Updated:
Weekly Rashi Bhavishya In Marathi: सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी या महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होत आहे. फेब्रुवारीच्या मध्यातील हा आठवडा काही राशीच्या लोकांना लाभदायी तर काही राशीच्या लोकांना अडचणीचा ठरू शकतो. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 या आठवड्यात काही राजयोग, ग्रहांचे संयोग तयार होत आहेत. शुभ आणि अशुभ योग निर्माण होत आहेत. याचा सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशींवरील साप्ताहिक परिणाम पाहुया.
1/8
सिंह (Leo) : आठवड्याची सुरुवात शुभेच्छांसह कराल. बहुप्रतीक्षित चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे तुमच्यात एक वेगळी ऊर्जा आणि आत्मविश्वास येईल. तुमची लोकप्रियता आणि व्यवसायाची विश्वासार्हता वाढेल. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल. व्यवसायासंदर्भातला प्रवास यशस्वी ठरेल. नोकरदार व्यक्तींना कार्यालयात अनुकूल परिस्थिती अनुभवायला मिळेल. टीमवर्कच्या साह्याने तुम्ही मोठी कामं सहज पूर्ण करू शकाल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.

advertisement
2/8
सिंह - आठवड्याच्या मध्यात अचानक एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याचा विचार करू शकता. नवीन पिढी आपल्या प्रिय व्यक्तींसह वेळ घालवण्यात आणि आयुष्याचा आनंद घेण्यात व्यग्र राहील. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील. सिंगल असलात, तर आवडीची कोणी तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. मैत्रीचं प्रेमसंबंधात रूपांतर होण्याची शक्यता आहे. रिलेशनशिप्स अधिक दृढ होतील.Lucky Color : Blue
Lucky Number : 4
सिंह - आठवड्याच्या मध्यात अचानक एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याचा विचार करू शकता. नवीन पिढी आपल्या प्रिय व्यक्तींसह वेळ घालवण्यात आणि आयुष्याचा आनंद घेण्यात व्यग्र राहील. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील. सिंगल असलात, तर आवडीची कोणी तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. मैत्रीचं प्रेमसंबंधात रूपांतर होण्याची शक्यता आहे. रिलेशनशिप्स अधिक दृढ होतील.Lucky Color : BlueLucky Number : 4
advertisement
3/8
कन्या (Virgo) : या आठवड्यात मुलांशी संबंधित काही मोठ्या चिंतांना तोंड द्यावं लागू शकतं. या समस्यांवर मात करण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अगदी छोटी कामं पूर्ण करण्यासाठीही अधिक मेहनत घ्यावी लागेल. कार्यालयात केवळ सहकाऱ्यांकडूनच नव्हे, तर वरिष्ठांकडूनही दुर्लक्ष सहन करावं लागू शकतं. कुटुंबातल्या सदस्याशी काही कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

4/8
कन्या - कौटुंबिक वादांमध्ये आई-वडिलांकडून अपेक्षित सहकार्य आणि पाठिंबा मिळणार नाही. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. मालमत्तेसंबंधीच्या वादांमुळे तुम्ही गुंतून राहाल. त्यामुळे तुमच्या उद्दिष्टांकडे लक्ष देणं कठीण जाईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवताना विशेष काळजी घ्यावी. प्रेमसंबंध अधिक बळकट करण्यासाठी, कामाच्या व्यापात वेळ काढून जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. वैयक्तिक नातेसंबंधांसोबतच आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्या.Lucky Color : Yellow
Lucky Number : 8
कन्या - कौटुंबिक वादांमध्ये आई-वडिलांकडून अपेक्षित सहकार्य आणि पाठिंबा मिळणार नाही. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. मालमत्तेसंबंधीच्या वादांमुळे तुम्ही गुंतून राहाल. त्यामुळे तुमच्या उद्दिष्टांकडे लक्ष देणं कठीण जाईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवताना विशेष काळजी घ्यावी. प्रेमसंबंध अधिक बळकट करण्यासाठी, कामाच्या व्यापात वेळ काढून जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. वैयक्तिक नातेसंबंधांसोबतच आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्या.Lucky Color : YellowLucky Number : 8
advertisement
5/8
तूळ (Libra) : आठवड्याच्या सुरुवातीला संवादामुळे गोष्टी सुधारतील किंवा बिघडतील. त्यामुळे इतरांशी बोलताना किंवा मोठा व्यवहार करताना नम्रपणे वागणं फायदेशीर ठरेल. या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं, तर मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी कनिष्ठांशी चांगलं वागावं आणि त्यांचा अपमान होईल असं वर्तन टाळावं. कार्यालयात कोणाच्याही चुकीचं समर्थन करू नका आणि विनोद करत असताना कोणाच्या भावना दुखावतील असं काहीही बोलणं टाळा. अन्यथा वर्षानुवर्षं जपलेलं नातं तुटण्याची शक्यता आहे.

6/8
तूळ - आठवड्याच्या मध्यात दिलासा मिळेल. नशिबाची साथ मिळेल. दीर्घ काळ प्रलंबित असलेली कामं प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होतील. नातेसंबंधांच्या बाबतीत काही चढ-उतार संभवतात. संपत्ती वगैरेसंदर्भात नातेवाईकांशी वाद होऊ शकतो. त्रयस्थ व्यक्तीच्या अति हस्तक्षेपामुळे नात्यात कटुता येऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी, नात्यात प्रामाणिक राहा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.Lucky Color : Red
Lucky Number : 10
तूळ - आठवड्याच्या मध्यात दिलासा मिळेल. नशिबाची साथ मिळेल. दीर्घ काळ प्रलंबित असलेली कामं प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होतील. नातेसंबंधांच्या बाबतीत काही चढ-उतार संभवतात. संपत्ती वगैरेसंदर्भात नातेवाईकांशी वाद होऊ शकतो. त्रयस्थ व्यक्तीच्या अति हस्तक्षेपामुळे नात्यात कटुता येऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी, नात्यात प्रामाणिक राहा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.Lucky Color : RedLucky Number : 10
advertisement
7/8
वृश्चिक (Scorpio) : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. घरातल्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही ठिकाणच्या माणसांचं सहकार्य आणि पाठबळ मिळेल. नोकरदार व्यक्तींचा विशेष कामगिरीबद्दल कार्यालयात सन्मान होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असलात, तर चांगल्या ठिकाणाहून ऑफर मिळू शकते. प्रमोशनचीही शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा किंवा सर्वसाधारण परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळू शकतं.

8/8
वृश्चिक - व्यवसायाच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे. व्यवसायात सातत्याने वाढ दिसून येईल. व्यवसायाशी संबंधित प्रवास लाभदायक ठरेल. विरुद्धलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाढेल. सिंगल असलात, तर आवडीची व्यक्ती जीवनात येऊ शकते. एकूणच, प्रेमसंबंध अनुरूप राहतील. वैवाहिक जीवन सुखी राहील. सासरच्या मंडळींकडून विशेष सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ थोडा प्रतिकूल राहू शकतो.Lucky Color : Green
Lucky Number : 3
वृश्चिक - व्यवसायाच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे. व्यवसायात सातत्याने वाढ दिसून येईल. व्यवसायाशी संबंधित प्रवास लाभदायक ठरेल. विरुद्धलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाढेल. सिंगल असलात, तर आवडीची व्यक्ती जीवनात येऊ शकते. एकूणच, प्रेमसंबंध अनुरूप राहतील. वैवाहिक जीवन सुखी राहील. सासरच्या मंडळींकडून विशेष सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ थोडा प्रतिकूल राहू शकतो.Lucky Color : GreenLucky Number : 3
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement