Dream Meaning: स्वप्नात या 3 गोष्टी दिसणं दुर्घटनेचा संकेत! काहीतरी वाईट घडतं, अशुभ वार्ता मिळते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dream Meaning In Marathi: प्रत्येक स्वप्न काही ना काही संकेत देत असेलच असे नाही. परंतु शास्त्रांनुसार, स्पष्टपणे आणि विशिष्ट वेळी दिसणारी स्वप्ने भविष्याबद्दल नक्कीच काही संकेत देतात.
मुंबई : स्वप्न पाहणं ही एक सर्वसाधारण बाब आहे. झोपेत जवळपास सर्वांनाच स्वप्न पडतात. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी स्वप्न पाहते. बरेच लोक स्वप्नांना कॉमन मानून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्ने एखाद्या व्यक्तीला भविष्याबद्दल चांगले आणि वाईट संकेत देतात. प्रत्येक स्वप्न काही ना काही संकेत देत असेलच असे नाही. परंतु शास्त्रांनुसार, स्पष्टपणे आणि विशिष्ट वेळी दिसणारी स्वप्ने भविष्याबद्दल नक्कीच काही संकेत देतात.
स्वप्नशास्त्रात, सांगितल्यानुसार काही स्वप्ने येणाऱ्या काळात एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या अडचणी दर्शवतात. ही स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तीने थोडे सावध राहिले पाहिजे. स्वप्नशास्त्रात तीन स्वप्नांचा उल्लेख आहे, त्यापैकी एक स्वप्न लंकेचा राजा रावणाने पाहिले होते, ते पाहून रावणही घाबरला. स्वप्नांबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या संकेतांबद्दल ज्योतिषी डॉ. अरविंद पचौरी यांच्याकडून जाणून घेऊया.
स्वप्नात एखाद्याचे लग्न होताना पाहणे -
लग्न हा एक अतिशय शुभ आणि मंगलमय प्रसंग आहे. पण जर आपल्याला स्वप्नात दुसऱ्याचे लग्न दिसले तर ते अजिबात चांगले मानले जात नाही. स्वप्नशास्त्रानुसार, असे मानले जाते की ज्या व्यक्तीला अशी स्वप्ने पडतात त्याने सतर्क राहावे. कारण ज्या व्यक्तीला अशी स्वप्ने पडतात, त्याच्या आयुष्यात अशी काही समस्या येऊ शकते जी तुम्हाला मृत्यूसारखे दुःख देऊ शकते. म्हणून, जर तुम्हालाही असे स्वप्न पडले असेल तर सावध रहा.
advertisement
स्वप्नात झाड पडताना पाहणे -
स्वप्नशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात झाड पडताना दिसले तर ते खूप अशुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न भविष्यात अपघात, आजार किंवा इतर कोणत्याही वाईट घटनेचे संकेत देते. म्हणून, असे स्वप्न पडले तर सावधगिरी बाळगा.
advertisement
गाढवाची स्वारी पाहणे -
स्वप्नशास्त्रानुसार, हे रावणाचे स्वप्न होते, ज्यामुळे तो घाबरला आणि चिंताग्रस्त झाला होता. रावणाने स्वप्नात स्वतःला गाढवावर स्वार होऊन दक्षिणेकडे जाताना पाहिले होते. रामचरितमानसानुसार, रावण जेव्हा भगवान रामाशी युद्ध करत होता, तेव्हा त्याला हे स्वप्न पडले होते. स्वप्नशास्त्रानुसार, असे स्वप्न पराभव किंवा मृत्यू दर्शवते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 14, 2025 1:07 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Dream Meaning: स्वप्नात या 3 गोष्टी दिसणं दुर्घटनेचा संकेत! काहीतरी वाईट घडतं, अशुभ वार्ता मिळते


