Weekly Rashi Bhavishya In Marathi: मेष, वृषभ, मिथुन, कर्क साप्ताहिक राशीभविष्य; मेहनत-प्रयत्नांचे शुभफळ मिळणार

Last Updated:
Weekly Rashi Bhavishya In Marathi: संकष्टी चतुर्थीनंतर फेब्रुवारी महिन्याचा सुरू होणारा तिसरा आठवडा काही राशीच्या लोकांना लाभदायी तर काही राशीच्या लोकांना त्रासाचा ठरू शकतो. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 या आठवड्यात काही राजयोग, ग्रहांचे संयोग तयार होणार आहेत. शुभ आणि अशुभ योग निर्माण होत आहेत. याचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींवरील साप्ताहिक परिणाम पाहुया.
1/7
मेष (Aries) : तुम्ही बेरोजगार असलात तर या आठवड्यात नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही काळापासून आजारी असलात, तर आरोग्यात सुधारणा होईल. कामातले अडथळे दूर होतील. उद्दिष्टांवर तुमचं लक्ष असेल आणि त्यासाठी मेहनत घेऊन प्रयत्न करा. विशेष म्हणजे मेहनतीचे आणि प्रयत्नांचे सकारात्मक परिणामदेखील मिळतील.

advertisement
2/7
मेष - तुम्ही नवीन प्लॅनवर काम करू शकता. त्यामध्ये हितचिंतक आणि सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमच्या व्यवसायाच्या विस्ताराची स्वप्नं साकार होताना दिसतील आणि बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. रिलेशनशिप्सच्या दृष्टीने हा आठवडा पूर्णपणे अनुकूल आहे. कुटुंबात ऐक्य राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासह पिकनिक किंवा पार्टीला जाण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Grey
Lucky Number : 7
मेष - तुम्ही नवीन प्लॅनवर काम करू शकता. त्यामध्ये हितचिंतक आणि सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमच्या व्यवसायाच्या विस्ताराची स्वप्नं साकार होताना दिसतील आणि बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. रिलेशनशिप्सच्या दृष्टीने हा आठवडा पूर्णपणे अनुकूल आहे. कुटुंबात ऐक्य राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासह पिकनिक किंवा पार्टीला जाण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : GreyLucky Number : 7
advertisement
3/7
वृषभ (Taurus) : आठवड्याच्या सुरुवातीला ऊर्जा आणि वेळ यांचं योग्य व्यवस्थापन केलं, तर इच्छित यश मिळू शकतं. कामाच्या ठिकाणी प्रत्येकाशी सुसंवाद ठेवणं योग्य ठरेल. तुमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा कोणी तरी तुमच्यावर रागावलं असेल, तर तुमचं काम आणि संबंध सुधारण्यासाठी पूर्ण संधी मिळेल. विशेष म्हणजे, यात तुम्हाला कुटुंबातल्या एका सदस्याची खूप मदत होईल.

4/7
वृषभ - आठवड्याच्या मध्यात उपजीविकेच्या क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. तसंच तुम्ही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून कामं वेगाने पूर्ण कराल. उत्पन्नाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात सुटतील. पूर्वजांची मालमत्ता मिळण्याची, तसंच मालमत्ता खरेदी-विक्रीची संधी असेल. आठवड्याच्या शेवटी काही धार्मिक-आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा योग येईल. तुमच्या प्रेमसंबंधात काही कटुता आली असेल, तर मित्राच्या मदतीने गैरसमजुती दूर होतील आणि तुमचे प्रेमसंबंध पुन्हा सुरळीत होतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे चिंता वाढू शकते.Lucky Color : Orange
Lucky Number : 16
वृषभ - आठवड्याच्या मध्यात उपजीविकेच्या क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. तसंच तुम्ही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून कामं वेगाने पूर्ण कराल. उत्पन्नाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात सुटतील. पूर्वजांची मालमत्ता मिळण्याची, तसंच मालमत्ता खरेदी-विक्रीची संधी असेल. आठवड्याच्या शेवटी काही धार्मिक-आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा योग येईल. तुमच्या प्रेमसंबंधात काही कटुता आली असेल, तर मित्राच्या मदतीने गैरसमजुती दूर होतील आणि तुमचे प्रेमसंबंध पुन्हा सुरळीत होतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे चिंता वाढू शकते.Lucky Color : OrangeLucky Number : 16
advertisement
5/7
मिथुन (Gemini) : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आरोग्याची आणि नातेसंबंधांची विशेष काळजी घ्यावी लागेल. दिनचर्येकडे आणि आहाराकडे लक्ष द्या. अन्यथा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हंगामी आजारांपासून सावध राहणं आवश्यक आहे. अचानक लांबच्या किंवा जवळच्या प्रवासाला जावं लागू शकतं. या प्रवासात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे. जोडीदार आणि आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

6/7
मिथुन - आठवड्याच्या मध्यात अचानक जमिनी आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणं त्रासदायक ठरू शकतात. त्यासाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागू शकतं. नोकरदार व्यक्तीसाठी दिवस सर्वसाधारण राहील. ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही सहकार्य मिळेल. संथ गतीने असला तरी व्यवसायात आर्थिक लाभ होत राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इच्छित यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. प्रेमसंबंध अधिक तीव्र होतील. कठीण काळात तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करील.Lucky Color : Cream
Lucky Number : 5
मिथुन - आठवड्याच्या मध्यात अचानक जमिनी आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणं त्रासदायक ठरू शकतात. त्यासाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागू शकतं. नोकरदार व्यक्तीसाठी दिवस सर्वसाधारण राहील. ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही सहकार्य मिळेल. संथ गतीने असला तरी व्यवसायात आर्थिक लाभ होत राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इच्छित यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. प्रेमसंबंध अधिक तीव्र होतील. कठीण काळात तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करील.Lucky Color : CreamLucky Number : 5
advertisement
7/7
कर्क (Cancer) : आठवड्याच्या सुरुवातीला काही चढ-उतार पाहायला मिळतील. कोणतंही काम घाईघाईने किंवा गोंधळलेल्या स्थितीत करू नका. अन्यथा मोठ्या आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असलात, तर संबंधित सर्व कागदपत्रं नीट वाचा आणि योग्य विचार करूनच निर्णय घ्या. काही कौटुंबिक समस्या तुमच्या चिंतेचं कारण बनू शकतात. या काळात कुटुंबातल्या सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य आणि पाठिंबा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही थोडे नाराज होऊ शकता; मात्र तुमचे मित्र कठीण प्रसंगी तुमच्यासाठी मोठा आधार ठरतील.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement