षटतिला एकादशी: तीळ वापरून 5 सोपे उपाय
1. षटतिला एकादशीच्या दिवशी गंगाजलात तीळ मिसळून स्नान करावे. शक्य असल्यास हिवाळ्यात तिळाचं उटणं करून लावावं. असं केल्यानं व्यक्ती निरोगी राहते आणि पापे नष्ट होतात. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर हे करणे टाळा.
2. षटतिला एकादशीच्या दिवशी पूजेनंतर तिळाचे दान करावे. या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान कराल तितकी जास्त वर्षे तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते. तिळाचे दान केल्यानं दारिद्र्य, दु:ख आणि दुर्भाग्य दूर होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहणं अशुभ! नकारात्मक विचार वाढतात, दिवस जातो खराब
3. षटतिला एकादशीच्या निमित्ताने जेवणात तीळ वापरावे. तीळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते.
4. षटतिला एकादशीला तीळ दान करण्यासोबतच काही रुपयेही दान करावेत. यासाठी तिळाच्या लाडूमध्ये काही नाणी टाकून दान करा. हे गुप्त दान तुमचे नशीब मजबूत करेल. प्रसिद्धी आणि यश मिळेल.
5. जर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल, राहू किंवा केतू किंवा पितृदोषाचा अशुभ प्रभाव असेल तर तुम्ही षटतिला एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करा. यामुळे तुमचा त्रास दूर होईल.
षटतिला एकादशी 2024 मुहूर्त -
पौष कृष्ण एकादशी तिथी प्रारंभ: 5 फेब्रुवारी, 05:24 PM
पौष कृष्ण एकादशी तिथीची समाप्ती: 6 फेब्रुवारी, दुपारी 04:07 वाजता
एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ: 7 फेब्रुवारी, 07:06 AM ते 09:18 AM
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)