advertisement

Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहणं अशुभ! नकारात्मक विचार वाढतात, दिवस जातो खराब

Last Updated:

Vastu Tips Marathi : सकाळी झोपेतून उठल्यानंतर ठराविक वस्तू पाहिल्यास व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांचा यात समावेश आहे.

News18
News18
मुंबई, 30 जानेवारी : आपल्या सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. आपल्या घरातील काही वस्तूंचाही आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सकाळी झोपेतून उठल्यानंतर ठराविक वस्तू पाहिल्यास व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांचा यात समावेश आहे.
सकाळी उठल्याबरोबर काही तुटल्या-फुटलेल्या वस्तू पाहू नयेत, विशेषत: तुटलेल्या घड्याळाकडे पाहू नये. घरात असे घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाका. त्यामुळं व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मकता येण्याची शक्यता असते.
अनेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहण्याची सवय असते. परंतु ती सवय धोकादायक ठरू शकते. त्यामुळं सकाळी-सकाळी उठल्यानंतर आरशात पाहणं टाळायला हवं.
सकाळी उठल्यानंतर कुणाची सावली पाहु नका, कारण त्यामुळं आपल्या आयुष्यात संबंधित व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता येण्याची शक्यता असते.
advertisement
घरातील तुटलेली भांडी आणि खराब फर्निचरमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. सकाळी उठल्यावर अशा गोष्टी पाहू नका. त्यामुळं अशा वस्तूंना आपल्या बेडरूमपासून लांब ठेवायला हवं.
सकाळी उठल्यानंतर अंथरुणातून थेट स्वयंपाकघरात जाऊ नका. कारण सकाळी-सकाळी स्टोव्हला आग लावणं हे अशुभ मानलं जातं. झोपेतून उठल्यानंतर 10-15 मिनिटांनी किचनमध्ये जायला हवं.
स्वयंपाकघरातील अस्वच्छ भांडी सकाळी उठल्यानंतर पाहू नका. आपल्यापैकी बरेच जण रात्रीच्या जेवणानंतर ती भांडी सिंकमध्ये सोडतात. सकाळी उठल्यानंतर ते धुतात. परंतु ते सकाळी उठल्यानंतर आपल्या नजरेस पडणं हे अशुभ मानलं जातं.
advertisement
सकाळी आपण जेव्हा स्वयंपाकघरात जातो, तेव्हा चुलीवर असणाऱ्या भांड्यातून आपल्याला वाफ निघताना दिसते. त्याला पाहु नये कारण यात नकारात्मक ऊर्जा असते.
घरातील स्वयंपाकघरातील काही भांडी काळ्या रंगाची असतात. तळताना या भांड्यांना काळे डाग पडतात. अशा भांड्यांना सकाळी सकाळी पाहु नये कारण त्यालाही अशुभ मानलं जातं.
advertisement
भोपळा खाणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार भोपळ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर भोपळा पाहू नये.
सकाळी उठल्यावर तलवारी, कात्री, काठ्यासुद्धा पाहू नयेत. यात नकारात्मक ऊर्जा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण त्यामुळं दिवसाची खराब सुरूवात होऊ शकते.
advertisement
(सूचना : या लेखात दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहणं अशुभ! नकारात्मक विचार वाढतात, दिवस जातो खराब
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement