धर्मशास्त्रात नाभीचे महत्त्व
धर्मशास्त्रांनुसार नाभी ही देवी लक्ष्मीचे निवासस्थान आहे. भगवान विष्णूंच्या नाभीतून कमळ प्रकट झाले आणि त्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. म्हणून नाभीला सृष्टीचे केंद्र आणि समृद्धीचे मूळ मानले जाते. श्रीमद्भागवत पुराणात विष्णूच्या नाभीतून उत्पन्न झालेले कमळ वैश्विक संपत्ती आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले गेले आहे.
आयुर्वेदात सांगितले आहे की, नाभीतून ७२,००० नसा शरीरभर जातात. या नसांमधून ऊर्जा, रक्त आणि जीवनशक्ती प्रवाहित होते. म्हणूनच चरक संहितेत म्हटले आहे. “नाभी प्राणस्य मूलम्” म्हणजे नाभी हा जीवनाचा मूळ स्रोत आहे.
advertisement
स्त्रीच्या नाभीला स्पर्श करण्याबाबत धार्मिक मत
पुराणांनुसार स्त्रीची नाभी गृहलक्ष्मीच्या ऊर्जेचे आसन आहे. लग्नानंतर स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटले जाते आणि तिच्या नाभीतून घरात सौभाग्य व समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. विष्णू धर्मसूत्रातही “लक्ष्मी नाभिस्थित” असा उल्लेख आहे. म्हणजे लक्ष्मी नाभीमध्ये निवास करते. त्यामुळे अपवित्र नजरेने किंवा अशुद्ध हेतूने नाभीला स्पर्श करणे हे लक्ष्मीचा अपमान मानले जाते.
धार्मिक दृष्टिकोनातून असे पाप मानले जाते की, स्त्रीच्या नाभीचा अपमान केल्यास अलक्ष्मीचा प्रवेश होतो. म्हणजे घरात कलह, गरिबी आणि मानसिक अस्थिरता वाढते.
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून नाभीचे आरोग्य
आयुर्वेद सांगते की नाभी ही शरीरातील पचन आणि ऊर्जा संतुलनाचे केंद्र आहे. सुश्रुत संहितेत म्हटले आहे. “नाभि देशे व्यथाभावः सर्वशरीरदुखकरणम्”, म्हणजे नाभीतील असंतुलनामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे नाभीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे किंवा ती अशुद्ध ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
आयुर्वेदानुसार, नाभीत शुद्ध तूप, तीळ किंवा मोहरीचे तेल लावल्याने शरीरातील अग्नी संतुलित राहतो, मन शांत होते आणि त्वचेचा तेज वाढतो. त्यामुळे नाभीची स्वच्छता आणि शुद्धता राखणे ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
चुकून अपमान झाल्यास उपाय पर्याय काय?
पद्म पुराणात म्हटले आहे .“यत्र स्त्रीह न सम्मान्यः, तत्र लक्ष्मीर्न तिष्ठति”, म्हणजे जिथे महिलांचा सन्मान होत नाही तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही. जर चुकून नाभीचा अपमान झाला असेल, तर शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा, कमळाचे फूल अर्पण, आणि “ओम ह्रीम श्रीं लक्ष्म्यै नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने दोष दूर होतो.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)