या दुकानात पेपर, प्लास्टिक, कापड आणि कागद यांसारख्या मटेरियलपासून बनवलेले विविध प्रकारचे कंदील पाहायला मिळतात. सर्वात लहान कंदील 36 प्रति पीस तर थोडा मोठा आणि मल्टीकलर कंदील 48 प्रति पीस या दरात उपलब्ध आहे. सर्वात मोठ्या आकारातील कंदील 125 प्रति पीस इतक्या स्वस्त दरात मिळत आहेत.
advertisement
मध्यम आकारातील आणि भारी क्वालिटीचे कंदील फक्त 780 डझन दराने विकले जात आहेत. वेलवेट मटेरियलमध्ये आकर्षक कंदील 80 प्रति पीस, तर मोठ्या साइजमध्ये 200 प्रति पीस आहेत. याशिवाय फ्लॉवर अटॅच असलेले कंदील 960 डझन, डबल कंदील 1680 डझन आणि सर्वात उठावदार महाराज कंदील 2280 डझन दराने उपलब्ध आहेत.
एम्पायर ट्रेडर्स, सुतार चाळ, मज्जिद बंदर या ठिकाणी हे सर्व कंदील उपलब्ध आहेत. पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइनमध्ये हे कंदील सजवले गेले आहेत.
उद्योजकतेची संधी शोधणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अत्यंत कमी दरात हे दर्जेदार कंदील खरेदी करून स्थानिक पातळीवर किंवा ऑनलाइन विक्री करताना चांगला नफा कमवता येऊ शकतो. सणासुदीच्या दिवसांत रोषणाईचा आणि व्यवसायाचा आनंद एकत्र अनुभवायचा असेल तर एम्पायर ट्रेडर्स ही योग्य जागा आहे, असे दुकानाचे मालक सांगतात.