नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल -
पाण्याला केवळ शास्त्रोक्तच नव्हे, तर वास्तुशास्त्रातही महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, पाण्याला घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत करणारा स्रोत मानले जाते. यासाठी घराच्या मुख्य दारात पाण्याने भरलेले भांडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने वाईट शक्ती मुख्य दरवाजाच्या आत येण्यापासून रोखते आणि घरातील लोकांचे दुर्भाग्यापासून संरक्षण होते. याशिवाय इतर अनेक अडचणींपासून तुमचे जीवन वाचवण्यास मदत होऊ शकते. हा उपाय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
घरात झाडू मारल्यानंतर ही गोष्ट न चुकता करा; कुटुंबाच्या सुख-शांतीशी थेट संबंध
वातावरण हसतं-खेळतं राहण्यास होते मदत -
वातावरण मंगलमय होण्यासाठी घराच्या प्रवेशद्नारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवू शकता. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचाही हा एक उत्तम मार्ग असू शकतो. पाण्यानं भरलेलं भांड दारात असणं घरात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांना चांगले दर्शन देते आणि पाहुणचाराचे प्रतीक मानले जाते.
पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचे वास्तू नियम -
1. पाणी भरून ठेवण्याचे हे भांडे तांबे किंवा पितळ यासारख्या धातूचे असल्यास उत्तम.
2. भांड्यातील पाणी नियमितपणे बदलले पाहिजे आणि भांडे देखील पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे.
3. दारात पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी योग्य जागा निवडण्यासाठी वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
4. हे भांडं एखाद्या टेबलावर किंवा कशावर तरी थोड्या उंचावर ठेवणे अधिक योग्य असेल, जेणेकरून ते पाहुण्यांना सहज दिसेलही.
5. घराच्या दारात पाण्याचे भांडे ठेवण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की ते थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णतेजवळ ठेवणं टाळा.
घरात झाडू मारल्यानंतर ही गोष्ट न चुकता करा; कुटुंबाच्या सुख-शांतीशी थेट संबंध
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)