TRENDING:

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेसाठी ही वस्तू सोन्यासमान! 5 रुपयांच्या खरेदीनंही उजळेल तुमचं नशीब

Last Updated:

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सर्वांनाच सोने खरेदी करणे शक्य होत नाही. सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 5 रुपयांतही आपण नशीब चमकवू शकता आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. सोन्याच्या रूपात धनलक्ष्मी घरी आणली जाते. या दिवशी खरेदी केलेले सोने अक्षय्य राहते, घरी येणारी लक्ष्मी कायम राहते, असे मानले जाते. पण, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सर्वांनाच सोने खरेदी करणे शक्य होत नाही. सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 5 रुपयांतही आपण नशीब चमकवू शकता आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊ, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीशिवाय आपण लक्ष्मीची पूजा किंवा आशीर्वाद कसा मिळवू शकतो.
News18
News18
advertisement

दर वर्षी वैशाख शुक्ल पक्षातल्या तृतीयेला अक्षय्य तृतीया असते. या वर्षी 10 मे रोजी हा सण आहे. 10 मे रोजी सकाळी 10 वाजून 54 मिनिटांपर्यंत रोहिणी नक्षत्र असेल. रोहिणी नक्षत्राच्या काळात खरेदीला सुरुवात करणं अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी सोने, चांदी आणि कपडे खरेदी करणे शुभ मानलं जातं.

अक्षय्य तृतीयेला बार्ली/जव पूजा - अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शक्य होत नसेल, तर 5 रुपये किमतीची बार्ली खरेदी करून त्याची पूजा करावी. जव (बार्ली) हे विश्वातील पहिले धान्य मानले जाते. जवाला संस्कृतमध्ये यव म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार बार्ली हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. हे संपूर्ण धान्य आहे. असे म्हटले जाते की, ब्रह्मदेवाने जेव्हा विश्वाची निर्मिती केली तेव्हा प्रथम बार्लीची उत्पत्ती झाली. पूजा आणि हवनातही बार्लीला विशेष स्थान आहे. नवरात्रीच्या काळात घटामध्ये बार्ली पेरण्याची परंपरा आहे.

advertisement

अक्षय्य तृतियेपासून या राशींचा भाग्योदय; अतिगंड योगात श्रीमंती पाहण्याचे योग

अक्षय्य तृतीयेला जवाच्या पूजेने माता लक्ष्मी प्रसन्न होईल -

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करताना पूजेत बार्ली वापरा. यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि तुमचे घर धन-धान्याने भरून जाईल. बार्ली हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे. जीवनात धन, ऐश्वर्य, सुख-समृद्धीसाठी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या पूजेचे पुण्य फळ चिरंतन मिळते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राची पूजा केल्याने लाभ मिळू शकतात. या दिवशी देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करणे शुभ आणि फलदायी मानले जाते.

advertisement

पूजा करताना माता लक्ष्मीचा महामंत्र ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. अक्षय्य तृतीयेला पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला आपल्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. कमळाचे फूल किंवा लाल गुलाबाचे फूल, कमलगट्टा, पिवळ्या कवड्या, गोड खीर, बताशा, दुधापासून बनवलेली मिठाई पूजेत अर्पण करू शकता.

advertisement

हेकेखोर की मनमिळावू? जन्मतारीख सांगेल कसा आहे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेसाठी ही वस्तू सोन्यासमान! 5 रुपयांच्या खरेदीनंही उजळेल तुमचं नशीब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल