Astrology: अक्षय्य तृतियेपासून या राशींचा भाग्योदय; अतिगंड योगात श्रीमंती पाहण्याचे योग
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Today Horoscope Marathi : ओरॅकलनं 12 राशींसाठी भविष्यवाणी केली आहे. मेष व्यक्तींना उत्कटता आणि रोमान्स अनुभवता येईल, तर वृषभ व्यक्तींना प्रेमात स्थिरता आणि निष्ठा मिळू शकते कर्क व्यक्ती तीव्र भावनिक संबंधांचा अनुभव घेतील, तर मिथुन व्यक्तींनी स्पष्ट संवादाला प्राधान्य द्यावं. सिंह व्यक्तींना उत्कट भेटींमुळे आनंद मिळू शकतो. कन्या व्यक्तींना विश्वासार्हता आणि विश्वास यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. वृश्चिक व्यक्तींनी परिवर्तनीय अनुभवांची तयारी केली पाहिजे, तर तूळ व्यक्तींचं लक्ष्य संतुलन राखणं हे असेल. मकर व्यक्ती स्थिर प्रेमाला महत्त्व देतात आणि धनू व्यक्ती साहसी क्षणांची कदर करतात. कुंभ व्यक्ती वैशिष्ट्यपूर्णतेला प्राधान्य देतील, तर मीन व्यक्ती आध्यात्मिक शोधात गुंतलेल्या असतील. (10 मे 2024)
मेष (Aries) मेष राशीच्या लोकांच्या रोमँटिक भावभावनांमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे. तयार झालेली नाही दृढ होतील आणि अविवाहित व्यक्तींचं एखादं नवं नातं जोडलं जाऊ शकतं. तुमच्या जवळच्यांशी प्रामाणिक राहणं आणि तुमच्या मनाचा आवाज ऐकणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. निष्ठा आणि नम्रपणा नाती दृढ करतील. अनपेक्षित आर्थिक प्रगती संभवते. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुमचा बहिर्मुख स्वभाव ही मोलाची गोष्ट ठरेल. स्वतःची काळजी घेतल्यानं आज तुमचा मूड चांगला असेल.
LUCKY Sign – A Red Coral
LUCKY Color - Silver
LUCKY Number - 1
advertisement
वृषभ (Taurus)वृषभ व्यक्तींचा आज स्थिर व विश्वासार्ह रोमँटिक प्रवास होऊ शकतो. सुसंवादी व सखोल नाती आज फुलतील. मैत्रीची कदर करा आणि विश्वास व निष्ठेवर भर द्या. भक्कम पायामुळे चिरस्थायी नातेसंबंध तयार होतील. आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये दीर्घकालीन लक्ष्य ठेवा. विश्रांती व स्वतःची काळजी घ्या. संतुलित जीवनशैलीचा आरोग्यासाठी फायदा होईल.
LUCKY Sign – A Crystal Jar
LUCKY Color – Maroon
LUCKY Number - 5
advertisement
मिथुन (Gemini) मिथुन व्यक्तींच्या नातेसंबंधात मनमोकळा संवाद आणि सहृदयतेची आवश्यकता आहे. जवळच्या मित्रमैत्रिणींबाबत प्रामाणिकपणा आणि विश्वास महत्त्वाचा आहे. आर्थिक चढ-उतार होऊ शकतात. करिअरमधल्या संधींबाबत अनुकूल राहा. लिखाण, मेडिटेशन यांसारख्या सजग क्रिया स्वास्थ्य राखण्यासाठी मदत करू शकतात.
LUCKY Sign – A Platinum Band
LUCKY Color – Magenta
LUCKY Number - 6
advertisement
कर्क (Cancer) ओरॅकल भविष्यानुसार, कर्क व्यक्तींचे नातेसंबंध आज घनिष्ठ आणि समृद्ध राहतील. हे बंध आणखी मजबूत करण्यासाठी विश्वास आणि बांधिलकी जपा. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगा. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी अंगभूत कौशल्यांचा वापर करा. आरोग्य राखण्यासाठी स्वतःची काळजी घ्या आणि मानसिक स्वास्थ्य जपा.
LUCKY Sign – Sandstone
LUCKY Color – Honey Brown
LUCKY Number - 66
advertisement
सिंह (Leo) सिंह व्यक्तींच्या लव्ह लाइफमध्ये काही रोमँटिक सरप्रायझेस मिळू शकतात. विश्वासार्ह व प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वामुळे नात्यांचा मजबूत पाया तयार करता येईल. अंगभूत नेतृत्वकौशल्यांमुळे आर्थिक लाभ व करिअरमधील यश संपादित करता येईल. आत्मविश्वास प्रस्थापित करा आणि स्वास्थ्य राखण्यासाठी सर्जनशील गोष्टींमध्ये वेळ घालवा.
LUCKY Sign –A Solo Performance
LUCKY Color - Violet
LUCKY Number - 26
advertisement
कन्या (Virgo) कन्या व्यक्तींनी रोमँटिक आयुष्यामध्ये स्थिरता व्यावहारिकता राखणं गरजेचं आहे. मोकळेपणानं संवाद साधणं आणि खरी नाती जोडणं महत्त्वाचं आहे. कठोर मेहनत व बारीकसारीक तपशीलांचा विचार करण्यानं आर्थिक स्थिरता व प्रगती साध्य करता येईल. संतुलित गोष्टींद्वारे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखता येऊ शकेल.
LUCKY Sign – A Silver Coin
LUCKY Color - Blue
LUCKY Number - 44
advertisement
तूळ (Libra) ओरॅकलच्या भविष्यवाणीनुसार, तूळ व्यक्तींचं प्रेमजीवन आज संतुलित आणि सुसंवादी राहील. प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता ही मैत्रीची गुरूकिल्ली असेल. आर्थिक प्रगती संभवते आणि सर्वांच्या सहयोगी प्रयत्नांमुळे तुमच्या करिअरला फायदा होईल. एकूण स्वास्थ्य राखण्यासाठी शांतता मिळवून देणाऱ्या गोष्टी करा.
LUCKY Sign – A Diamond Ring
LUCKY Color – Coral Pink
LUCKY Number - 8
advertisement
वृश्चिक (Scorpio) वृश्चिक व्यक्तींना उत्कट आणि वेगळे रोमँटिक अनुभव येतील. समोरच्याचा विश्वास संपादित करणं याला प्राधान्य दिलं पाहिजे. तुमच्या जीवनात आर्थिक स्तरावर बदल होतील. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी लवचिकता उपयोगी ठरेल. आत्मचिंतन करण्याकडे आज लक्ष द्या. त्याचा फायदा होईल.
LUCKY Sign – A Handwritten Note
LUCKY Color - Peach
LUCKY Number - 21
advertisement
धनू (Sagittarius) धनू व्यक्तींना उत्स्फूर्त आणि उत्कट लव्ह लाइफ अभवायला मिळेल. सच्च्या मैत्रीला प्रोत्साहन देणं आणि उत्स्फूर्तता स्वीकारणं फायदेशीर ठरेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर आर्थिक प्रगती आणि करिअरमध्ये यश मिळवता येऊ शकतं. व्यायाम व बाहेरच्या वातावरणात करण्याचे व्यायाम करावेत.
LUCKY Sign – A Stained Glass Window
LUCKY Color – Aquamarine Blue
LUCKY Number - 22
advertisement
मकर (Capricorn) मकर व्यक्तींच्या रोमँटिंक आयुष्यात स्थिरता आणि बांधिलकी राहील. मैत्रीमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणाला प्राधान्य दिलं पाहिजे. आर्थिक सुरक्षितता मिळेल आणि शिस्त राखल्यास करिअरमध्ये प्रगती साध्य करता येऊ शकते. शांत राहण्यासाठी आवश्यक गोष्टी करा.
LUCKY Sign – A Peepal Tree
LUCKY Color – Neon Green
LUCKY Number - 17
advertisement
कुंभ (Aquarius) कुंभ व्यक्तींच्या लव्ह लाइफमध्ये कलाटणी देणारे अनुभव मिळू शकतात. सच्चेपणा आणि खुलेपणानं गोष्टींचा स्वीकार करणं नातेसंबंध दृढ करू शकतं. नावीन्यपूर्ण कल्पनांद्वारे अचानक काही आर्थिक बदल किंवा करिअरमध्ये प्रगती संभवते. मानसिक आरोग्यासाठीच्या गोष्टी करण्यावर लक्ष द्या.
LUCKY Sign – An Iron Board
LUCKY Color - Yellow
LUCKY Number - 56
advertisement
मीन (Pisces) मीन व्यक्तींच्या लव्ह लाइफमध्ये सखोल भावनिक बंध राहतील. करुणा आणि सहृदयता ठेवल्यानं हे बंध आणखी मजबूत होतील. लक्ष केंद्रित केलं तर आर्थिक स्थिरता साध्य करता येण्यासारखी आहे. स्वास्थ्य राखण्यासाठी आंतरिक शांतता देणाऱ्या क्रिया करणं फायदेशीर ठरू शकतं.
LUCKY Sign – An Antique Item
LUCKY Color – Cream
LUCKY Number – 29