इंदिरा एकादशी व्रत -
ज्योतिषांच्या मते, यंदा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी सोमवार, 09 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.36 वाजता सुरू होईल. ही तिथी मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 03:08 वाजता संपेल. अशा स्थितीत उदयाथीच्या आधारे इंदिरा एकादशीचे व्रत 10 ऑक्टोबर म्हणजेच आज मंगळवारी पाळले जात आहे.
इंदिरा एकादशीचा शुभ मुहूर्त?
advertisement
इंदिरा एकादशी व्रताची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आज सकाळी 09:13 ते दुपारी 01:35 पर्यंत आहे. यामध्ये लाभ-उन्नती मुहूर्त सकाळी 10:41 ते दुपारी 12:08 पर्यंत आहे, तर अमृत-सर्वोत्तम मुहूर्त 12:08 ते दुपारी 01:35 पर्यंत आहे. मुहूर्ताव्यतिरिक्त, तुम्ही इंदिरा एकादशीला सकाळी उपवास करून भगवान विष्णूची पूजा करू शकता.
Indira Ekadashi Vrat 2023: इंदिरा एकादशी व्रताच्या दिवशी वाचावी ही कथा, पूर्वजांना मिळतो मोक्ष
इंदिरा एकादशी व्रताची उपासना पद्धत जाणून घ्या -
इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळी उठून दैनंदिन कामे उरकून स्नान करावे. यानंतर तुम्ही व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. पूजेच्या वेळी अक्षत, पिवळी फुले, पंचामृत, तुळशीची पाने, चंदन, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादी गोष्टी परमेश्वराला अर्पण कराव्यात. दिवसभरात "ओम नमो भगवते वासुदेवाय नमः" या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. इंदिरा एकादशीची व्रत कथा वाचा आणि नंतर पितरांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची प्रार्थना करा. या व्रताचे पुण्य फळ पितरांना दान करा. यामुळे त्यांची अधोगतीपासून मुक्तता होईल. रात्री जागरण करू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून दान केल्यानंतर व्रत सोडावे.
पितृपक्षात कावळा अशा पद्धतीनं देतो शुभ-अशुभ संकेत, पूर्वज अतृप्त असतील तर..?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)