सोलापूर : महाराष्ट्रात रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोलापुरात लोधी समाजाच्या रंगपंचमीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. 150 वर्षांपासून लोधी समाज बांधवांकडून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात फक्त लोधी समाजच नाही तर परिसरात राहणारे राजपूत समाज, तेली समाज, मोची समाज, मुस्लीम समाज इतर सर्व समाज बांधव मिळून अतिशय उत्साहात हा उत्सव दरवर्षी साजरा करतात.
advertisement
सुमारे 150 वर्षांची परंपरा असणाऱ्या लोधी समाजाच्या रंगपंचमी निमित्त शहरातून मोठी मिरवणूक निघते. या रंगाड्याच्या मिरवणुकीस मोठ्या उत्साहात बेडर पूल इथून सुरुवात करण्यात आली. लोधी समाज पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करतो. जवळपास 100 बैलगाड्यांचा ताफा, त्याचबरोबर पारंपारिक वाद्य घेऊन लोकगीत गात ही मिरवणूक परिसरात फिरते. सबंध महाराष्ट्रात फक्त सोलापुरात लोधी समाजाच्या वतीने अशी अनोखी रंगपंचमी साजरी होत असते.
उन्हाळ्यात कोणता माठ चांगला, लाल, काळा की पांढरा? कोणत्या माठात लवकरच होतं पाणी गार!
बैलगाडीमध्ये बसून एकमेकांवर रंगाचे उधळण करत एकमेकांवर पाण्याचा वर्षाव करण्यात येत असतो. तसेच लोधी समाज बांधव रंगगाडी मिरवणूक ही लष्कर परिसरातील जगदंबा चौक या ठिकाणी आले असता. मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने रंगगाड्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना रंगपंचमीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
डोक्यावर टोपी हातात फुलं आणि मुस्लिम बांधवांचे फुलांचे वर्षाव पाहून सारेच थक्क झाले जसे जसे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने फुलांचे वर्षाव करण्यात येत होते तसे तसे हिंदू समाज बांधवांच्या वतीने टाळ्यांचा एकच गजर करत होते. तसचे हम सब एक है च्या घोषणा यावेळी ऐकण्यास मिळाले. तर मुस्लिम समाजाच्या वतीने वाहिद बिजापुरे यांनी रंगगाडी मिरवणुकीचे स्वागत करत रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या तर माजी नगरसेवक बडूरवाले यांनी मुस्लिम समाज बांधवांचे आभार मानले. महाराष्ट्रात फक्त सोलापुरात लोधी समाजाच्या वतीने अशी अनोखी रंगपंचमी साजरी होत असते.