पूजेच्या खोलीत कापूर ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे ऊर्जा वाढते, घरातील वातावरण स्वच्छ आणि शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक शांती मिळते. वास्तुनुसार, कापूर घरातील पूजेच्या खोलीत ठेवणं सर्वांत आवश्यक मानलं जातं. कापूर सकारात्मक ऊर्जा पसरवतो आणि घरातील वातावरण शुद्ध करतो. बेडरूममध्ये कापराचा तुकडा ठेवल्यास घरातील लोकांना मानसिक शांती मिळते.
advertisement
तसेच यामुळे चांगली झोपही लागते. घरात प्रवेशद्वाराजवळ कापराचा तुकडा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर राहतात. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं. वास्तुनुसार, स्वयंपाकघरात कापूर ठेवल्याने खाद्यपदार्थांना किडे किंवा कीटक लागत नाहीत. तसंच यामुळे कधीच अन्न व संपत्ती कमी होत नाही.
रोज सकाळी आंघोळ करून पूजा करत असाल तर कापूर अवश्य लावावा. कापरामुळे घरातील वातावरण शुद्ध करण्यासोबतच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. इतकंच नाही तर कापूर जाळल्यास घरात समृद्धी येते आणि भरभराट येते.
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या असतील तर कापराचे उपाय करून पहा. घराच्या तिजोरीत कापराचा तुकडा ठेवा. यामुळे पैशाची आवक होण्याची शक्यता आहे. तसेच अनावश्यक खर्च होणार नाही. तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा खिशातही कापूर ठेवू शकता. याचाही फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.
हिंदू धर्मात कापूर हा पूजा साहित्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. आरतीनंतर रोज कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. या शिवाय वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात कापराला खूप महत्त्व देण्यात आले आहे.
