मुख्य दरवाजाची विशेष काळजी घ्या -
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. मुख्य दरवाजाद्वारे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. घराचा मुख्य दरवाजाला वेळोवेळी रंग द्या आणि त्यावर तोरणही बांधा. असं केल्यानं घरमालक आणि भाडेकरू यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध राखले जातात.
या गोष्टी ताबडतोब काढा -
advertisement
वास्तुशास्त्रानुसार भाड्याने घर देण्यापूर्वी तुटलेल्या-फुटलेल्या गोष्टी दुरुस्त करा किंवा त्या ताबडतोब काढून टाका. या खराब झालेल्या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात. घरात भाडेकरू राहणार आहेत, म्हणून तेथे कोणत्याही प्रकारची रद्दी किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका.
सूर्यग्रहणानंतर 15 दिवसात चंद्रग्रहण! या राशीच्या लोकांना नशिबाची मिळणार साथ
नळाची विशेष काळजी घ्या -
वास्तुशास्त्रानुसार भाड्याने घर देण्यापूर्वी घरातील प्रत्येक नळ नीट तपासा. कोणताही नळ गळत नाही याची खात्री करा. नळातून पाणी टपकत असेल तर भाड्याने राहायला आलेल्या व्यक्तीला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्याला व्यवसाय आणि नोकरीतही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
घराचा हा भाग भाड्याने देऊ नये -
वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही राहत असलेल्या घरातील काही भाग भाड्यानं द्यायचा असेल तर चुकूनही दक्षिण-पश्चिम भाग भाड्याने देऊ नका. असे केल्याने भाडेकरूच मालक बनण्याची शक्यता बर्याच प्रमाणात वाढते.
पितृपक्षात कावळा अशा पद्धतीनं देतो शुभ-अशुभ संकेत, पूर्वज अतृप्त असतील तर..?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)