विनायक चतुर्थी 2024 कधी आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी बुधवार, 13 मार्च रोजी पहाटे 02:33 पासून सुरू होईल. ही तिथी 13 मार्च रोजी रात्री 11:55 वाजता संपत आहे. उदयतिथीच्या आधारे बुधवार, 13 मार्च रोजी विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे.
विनायक चतुर्थी व्रत 3 शुभ संयोगात -
advertisement
यावेळी विनायक चतुर्थी 3 शुभ संयोगात येत आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी रवि योग, इंद्र योग आणि बुधवार आला आहेत. रवि आणि इंद्र हे दोन्ही शुभ योग आहेत, ज्यामध्ये पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते, तर बुधवार हा गणेश पूजेसाठी समर्पित वार आहे, या दिवशी आलेली विनायक चतुर्थी खूप शुभ आहे.
व्रताच्या दिवशी सकाळी 06:33 ते संध्याकाळी 06:24 पर्यंत रवि योग आहे. तर इंद्र योग पहाटेपासून रात्री उशिरा 12.49 पर्यंत आहे.
विनायक चतुर्थी 2024 मुहूर्त -
विनायक चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11:06 ते दुपारी 01:33 पर्यंत आहे. या काळात विनायक चतुर्थीची पूजा करावी.
विनायक चतुर्थी 2024 चा चंद्रोदय वेळ -
13 मार्च रोजी विनायक चतुर्थी, चंद्रोदय सकाळी 08:22 वाजता होईल आणि चंद्रास्त रात्री 09:58 वाजता होईल.
शनिदोष, साडेसातीचा त्रास टाळण्यासाठी हा सोपा उपाय; या 5 राशींना विशेष लाभदायी
विनायक चतुर्थीला भद्रकाळ -
विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्रकाळाची छाया असेल. व्रताच्या दिवशी, भद्रकाळ दुपारी 02:40 पासून सुरू होईल आणि 01:25 पर्यंत चालेल.
विनायक चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व -
जो कोणी विनायक चतुर्थीला उपवास करून गणपती बाप्पाची पूजा करतो त्याचे कार्य सफल होते. श्रीगणेश त्याच्या जीवनातील संकटे दूर करतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
झोपाळ्याचं वास्तुशास्त्र! घरात झोपाळा या दिशेला असणं शुभ, झुलण्यापूर्वी पहा नियम
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)