दरवर्षी फाल्गुन शुद्ध चतुर्दशीची पौर्णिमा या दिवशी होलिका दहन केलं जातं. हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य, त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवंताचा अतिशय निस्सिम भक्त होता. भक्त प्रल्हाद नेहमी भगवंताचे नामस्मरण करायचा. राक्षसाच्या राज्यात देवाचं नाव, स्वतःचाच पुत्र घेत असल्याने हिरण्यकश्यपूने स्वतःचा पुत्र प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु ते असफल ठरले.
धुलीवंदनला भांग पिण्याचा प्लॅन करताय, जीवाशी जाल, आधी हे वाचा
advertisement
त्याला उकळत्या तेलात टाकण्यात आले, डोंगरावरून फेकून देण्यात आले परंतु एवढं करूनही भक्त प्रल्हादाला मृत्यू येत नाही हे लक्षात आल्यानंतर हिरण्यकश्यपूच्या बहिणीने जिहिला अग्नीपासून वाचण्याचा वरदान होतं, तिने प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि अग्नी प्रज्वलित केली. परंतु यावेळी मात्र चुकीचा हेतू असल्याने हिरण्यकश्यपूची बहीण अग्नीमध्ये भस्मसात झाली आणि यामधूनही प्रल्हाद सुखरूप बाहेर आला. तेव्हापासूनच होलिका दहनाची परंपरा सुरू झाली.
एरंडाचे झाड हे सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत आहे. यामुळे एरंडाचे झाड हे होलिका दहन करत असताना होळीमध्ये ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच ऊसाला देखील जमिनीमध्ये काढण्याची परंपरा होळीच्या दिवशी आहे. समाजामध्ये असलेल्या अनेक नकारात्मक ऊर्जा नाहीशा होऊन सकारात्मक ऊर्जेचा स्रोत तयार व्हावा आणि पृथ्वीवर आनंद आणि सकारात्मकता रहावी यासाठी होलिका दहन महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर राजेश महाराज सामानगावकर यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.