दुबई: १९ वर्षाखालील आशिया चषकात भारतीय संघाचा जबरदस्त फॉर्म सुरूच आहे. स्फोटक फलंदाजांच्या कामगिरीमुळे संघाने प्रतिस्पर्ध्यांवर दहशत निर्माण केली आहे. पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने १७१ धावांची झंझावाती खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र त्यानंतर अभिज्ञान कुंडूने त्याहूनही मोठा धमाका करत भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.
advertisement
मलेशियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात अभिज्ञान कुंडूने अप्रतिम फलंदाजी करत भारताला डोंगराएवढ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० ओव्हरमध्ये ७ बाद ४००८ धावांचा डोंगर उभा केला. यात अभिज्ञानच्या द्विशतकाचा समावेश होता. त्याने फक्त १२५ चेंडूत ९ षटकार आणि १७ चौकारांसह नाबाद २०९ धावा केल्या.
अभिज्ञान या वादळी खेळीने क्रिकेटविश्वाला चकित केले. या खेळीत त्याने इतकी आक्रमक आणि विध्वंसक फलंदाजी केली की पाकिस्तानचा सलामीवीर समीर मिन्हास याने याआधी केलेली मोठी धावसंख्या देखील फिकी पडली.
