पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात रोहित शर्माने या सामन्यात चिटींग काय केली. रोहित शर्मा तब्बल 11 किलो वजन कमी केल्यानंतर मैदानात उतरला आहे.या दरम्यान त्याने जीममध्ये प्रचंड घाम गाळला.त्याचसोबत त्याच्या डाएटमध्ये देखील त्याने अनेक बदलाव केले होते.त्यामुळे इतक्या कठोर गोष्टीचं पालन केल्यामुळे तो 11 किलो वजन कमी करू शकला. पण ऑस्ट्रेलिया विरूद्ध सामन्यात रोहित शर्मा शुभमन गिलसोबत पॉपकॉर्न खाताना कॅमेरात कैद झाला. त्यामुळे रोहितचा आज चीट डे झाला. त्यामुळे रोहितने आज चीट डे केल्याची चिटींग केली.
advertisement
त्यामुळे रोहितला पॉपकॉर्न खाताना पाहून फिटनेस कोच अभिषेक नायर त्याच्यावर प्रचंड भडकला, आणि लाईव्ह कॉमेंट्रीमध्येच म्हणाला तो आता पॉपकॉर्न खाल्यामुळे साडे 10 किलोचा झाला आहे, असा चिमटा अभिषेक नायरने सूरूवातीला त्याला काढला.
"मलाही वाटलं नव्हतं की त्याचं (रोहित शर्मा) वजन इतकं कमी होईल.आम्ही हे आधी करून पाहिलं होतं पण वेळेअभावी किंवा काही मालिकांमुळे ते सातत्य रहायचं नाही.पण रोहित शर्माने तीन महिन्यात वजन कमी केलं आहे. पहिले पाच आठवडे आम्ही बॉडी बिल्डरच्या माईंड सेटने वर्कआऊट केले. ज्यामध्ये त्याने प्रत्येक व्यायामाची रेपेटेशन वाढवली. प्रत्येक बॉर्डी पार्टसाठी त्याने 700 ते 800 रेप्स मारले. आणि नंतर प्रत्येक सत्र
15-20 मिनिटे क्रॉस फिटने पूर्ण करत होता जो अधिक कार्डिओ-आधारित आणि हालचालींवर आधारित होता.म्हणून 3 महिन्यात प्रत्येक आठवड्याचे 6 दिवस आणि प्रत्येक दिवसाचे तीन तास देऊन त्याने वजन घटवलं असे अभिषेक नायर म्हणाला.
पण इतक्यावर सर्व चालणार नव्हतं. कारण तोंडावर ताबाही गरजेचा होता.त्यामुळे आम्हाला त्याच्या खाण्याच्या सवयीत बदल आणायचा होता. त्यामुळे त्याने घरी जाऊन प्रसिद्ध वडापाव खाणार नाही अशी त्याची वचनबद्धता होती.खेळाप्रती त्याची वचनबद्धता होती. जेव्हा तुमचे शरीर वजन कमी करते तेव्हा एक..."तुमच्या हालचालींमध्ये, तुम्हाला कसे वाटते यात खूप बदल झाले आहेत, म्हणून ते प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, ते खूप कठीण काम होते. बॉडी बिल्डर बनण्यासाठी ते दुबळे आणि अॅथलेटिक असणे,असे अभिषेक नायर म्हणाला.