भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरून काढून टाकल्यानंतर अभिषेक नायर पुन्हा कोलकाता नाईट रायडर्स संघात सामील झाला आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.घरी परत स्वागत आहे, अभिषेक नायर," केकेआरने सोशल मीडियावर नायरचा जर्सीमधील फोटो शेअर करताना लिहिले आहे.
बीसीसीआयकडून हकालपट्टी
भारतीय क्रिकेट टीमचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांची बीसीसीआयने हकालपट्टी केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ महिन्यांच्या कार्यकाळानंतर अभिषेक नायरचा करार रद्द करण्यात आल्याचं वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं. नायरसोबतच फिल्डिंग कोच टी दिलीप तसंच स्ट्रेन्थ ऍण्ड कंडिशनिंग ट्रेनर सोहम देसाई यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 'काही गोष्टींनी अंतिम स्वरूप दिलं जात आहे, पुढच्या काही दिवसात तुम्हाला बीसीसीआय एक प्रेस नोट देईल', असं सैकिया यांनी पीटीआयसोबत बोलताना सांगितलं.