TRENDING:

Komal Sharma Wedding : मुख्यमंत्री आले पण लाडक्या बहिणीच्या लग्नाला आलाच नाही अभिषेक शर्मा, हळद लावून कुठं गायब झाला?

Last Updated:

Abhishek Sharma sister Wedding : अभिषेकचा कोच आणि वर्ल्ड कप विनर युवराज सिंग देखील लग्नात शरवानी घालून पोहोचला होता. मात्र, चेला अभिषेक शर्मा हळद लावून निघून गेला. कुठं? तर क्रिकेट खेळायला...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Abhishek Sharma Sister Komal Sharma Wedding : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्मा आणि लुधियानाचे व्यापारी लविश ओबेरॉय यांचं लग्न 3 ऑक्टोबर रोजी पंजाबमधील अमृतसर पार पडलं. हा माझ्यासाठी खूप खास दिवस आहे, मी आज लग्न करत आहे. मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. मला माझ्या भावाची आठवण येते, असं कोमल शर्मा यावेळी म्हणाली. पण अभिषेक शर्मा बहिणीचं लग्न सोडून कुठं गायब झाला? असा सवाल विचारला जाऊ लागला. त्यानंतर अभिषेक शर्मा सर्वांच्या समोर आला. पण थेट कानपूरमध्ये...
Abhishek Sharma Sister Komal Sharma Wedding
Abhishek Sharma Sister Komal Sharma Wedding
advertisement

अभिषेक शर्मा हळद लावून निघून गेला

अभिषेक शर्माच्या लग्न समारंभात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू, अमृतसरचे खासदार गुरजीत सिंग औजला असे अनेक पाहुणे उपस्थित होते. तसेच अभिषेकचा कोच आणि वर्ल्ड कर विनर युवराज सिंग देखील लग्नात शरवानी घालून पोहोचला होता. मात्र, चेला अभिषेक शर्मा हळद लावून निघून गेला. कुठं? तर क्रिकेट खेळायला.

advertisement

advertisement

अभिषेक शर्मा कानपूरमध्ये...

बहिणीच्या लग्नाच्या दिवशी अभिषेक शर्मा कानपूरमध्ये ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ संघादरम्यानचा दुसरा अनधिकृत एकदिवसीय सामना खेळत होता. बहिणीचं लग्न सोडून अभिषेक शर्माला काळजावर दगड ठेवून मैदानात उतरावं लागलं. मात्र, अभिषेकच्या मनाला देखील हे मान्य नव्हतं. त्यामुळे त्याला मैदानात चांगली कामगिरी करता आली नाही.

advertisement

अभिषेक शर्मा शुन्यावर बाद

दरम्यान, ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर जगातील नंबर वन टी-20 फलंदाज अभिषेक शर्मा बाद झाला. या सामन्यामुळे अभिषेक आज अमृतसरमध्ये त्याच्या एकुलत्या एक बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नाही.

भारत अ संघ : अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, रियान पराग, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, हर्षित राणा, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास घेत नाही एकही रुपया, डॉक्टर नाही देवमाणूस!
सर्व पहा

ऑस्ट्रेलिया अ संघ: मॅकेन्झी हार्वे, जेक फ्रेझर-मॅकगर्क (यष्टीरक्षक), लाचलन हर्न, कूपर कॉनोली, जॅक एडवर्ड्स (कर्णधार), लाचलन शॉ, हॅरी डिक्सन, लियाम स्कॉट, विल सदरलँड, सॅम इलियट, तन्वीर संघा.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Komal Sharma Wedding : मुख्यमंत्री आले पण लाडक्या बहिणीच्या लग्नाला आलाच नाही अभिषेक शर्मा, हळद लावून कुठं गायब झाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल