दुनिथ वेलालागेला 5 सिक्स मारले
अफगाणिस्तान 150 पर्यंत पोहोचणार नाही, अशी शक्यता असताना अफगाणिस्ताचा ऑलराऊंडर आणि प्रेसिडेंट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मोहम्मद नबी याने 20 व्या ओव्हरमध्ये दुनिथ वेलालागे याला 5 सिक्स मारले. या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 32 धावा केल्या अन् 169 चा स्कोर उभा केला. मोहम्मद नबीने पहिल्या चार बॉलवर चार सिक्स मारले. त्यानंतर दुनिथ वेलालागे याने पाचवा बॉल वाईड टाकला. त्यानंतर नबीने सहाव्या बॉलवर पुन्हा सिक्स मारला. सातव्या बॉलवर नबीला सिक्स खेचता आला नाही. अखेरच्या बॉलवर त्याने एक धाव घेतली.
advertisement
युवराज सिंगचा रेकॉर्ड थोडक्यात बचाव
नबीच्या कामगिरीमुळे भारतीयांनी देव पाण्यात ठेवले होते. युवराज सिंगचा रेकॉर्ड थोडक्यात बचावला. 19 सप्टेंबर 2007 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथील किंग्जमीड स्टेडियमवर झालेल्या पहिल्या 2007 आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात युवराज सिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले. अँड्र्यू फ्लिंटॉफशी झालेल्या वादानंतर, युवराज सिंगने आपला राग व्यक्त केला, त्याने चेंडूवर सलग 6 सिक्स मारले आणि 12 चेंडूत इतिहासातील सर्वात जलद टी-ट्वेंटी अर्धशतक ठोकलं होतं.
कशी झाली मॅच?
दरम्यान, श्रीलंकेने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सने पराभव करत सुपर फोरमध्ये प्रवेश केला. या विजयामुळे बांगलादेशलाही सुपर फोरमध्ये स्थान मिळाले आहे, तर अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. मोहम्मद नबीने 22 बॉलमध्ये 60 धावांची शानदार खेळी केली, ज्यात पाच सिक्सचा समावेश होता. श्रीलंकेकडून नुवान थुशाराने 18 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर श्रीलंकेने 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 171 धावांचे लक्ष्य गाठले. कुशल मेंडिसने 52 बॉलमध्ये 74 धावांची नाबाद खेळी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.