Asia Cup : एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारले, पण वेलालागेच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच नबीला बसला धक्का, पाहा Video

Last Updated:

Mohammad Nabi On Dinuth Wellalage Father death : सामना संपल्यानंतर अफगाणिस्तानची टीम ड्रेसिंग रुममधून हॉटेलमध्ये जात असताना काही रिपोर्ट्सने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला गाठलं अन् त्याला माहिती दिली.

Mohammad Nabi On Dinuth Wellalage Father death
Mohammad Nabi On Dinuth Wellalage Father death
Dinuth Wellalage Father Passes Away : आशिया कपच्या (Asia Cup 2025) लीग स्टेजचा अखेरचा सामना सुरू असताना श्रीलंकेमधून दु:खद बातमी समोर आली. श्रीलंकेचा 22 वर्षांचा स्टार खेळाडू दुनिथ वेलालागे (Dinuth Wellalage Father death) याच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी समोर आली. सामना सुरू असताना दुनिथ वेलालागेला काहीही सांगण्यात आलं नव्हतं. मॅच संपल्यावर त्याची घरी जाण्याची व्यवस्था करण्यात आली. दुनिथ वेलालागे याला सामन्यात देखील अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडून मार खावा लागला होता. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) दुनिथ वेलालागेला एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स मारले होते. पण दुनिथ वेलालागेच्या वडिलांची बातमी ऐकताच नबीला धक्का बसला.

दुनिथ वेलालागेच्या वडिलांचं निधन, नबीला धक्का बस

सामना संपल्यानंतर अफगाणिस्तानची टीम ड्रेसिंग रुममधून हॉटेलमध्ये जात असताना काही रिपोर्ट्सने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला गाठलं अन् त्याला माहिती दिली. दुनिथ वेलालागेच्या वडिलांचं निधन झालं आहे, असं ऐकताच नबीला धक्का बसला. कसं काय? असा सवाल त्याने लगेच विचारला. त्यावर पत्रकारांनी उत्तर दिलं की, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नबीचा चेहरा उतरला. दुनिथ वेलालागेला मॅचनंतर माहिती देण्यात आली, असं देखील पत्रकारांनी नबीला सांगितलं.
advertisement
advertisement

खंबीर राहा भाऊ...

मोहम्मद नबीला माहिती मिळताच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून संवेदना व्यक्त केल्या. दुनिथ वेलालागे आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रिय वडिलांच्या निधनाबद्दल मनापासून संवेदना, असं ट्विट मोहम्मद नबीने केलं आहे. खंबीर राहा भाऊ, असं म्हणत नबीने त्याला पाठिंबा देखील दिला आहे.

अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर

advertisement
दरम्यान, श्रीलंकेने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सने पराभव करत सुपर फोरमध्ये प्रवेश केला. या विजयामुळे बांगलादेशलाही सुपर फोरमध्ये स्थान मिळाले आहे, तर अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. मोहम्मद नबीने 22 बॉलमध्ये 60 धावांची शानदार खेळी केली, ज्यात पाच सिक्सचा समावेश होता. श्रीलंकेकडून नुवान थुशाराने 18 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर श्रीलंकेने 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 171 धावांचे लक्ष्य गाठले. कुशल मेंडिसने 52 बॉलमध्ये 74 धावांची नाबाद खेळी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारले, पण वेलालागेच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच नबीला बसला धक्का, पाहा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement