Fraud : ऑनलाइन ऑर्डर केले 6000 रुपयांचे शुज, पत्ता अपडेट करायला ओपन केली लिंक आणि महिलेला घातला गंडा

Last Updated:

मधुलिका शर्मा यांनी एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 6,000 रुपयांचे शूज ऑर्डर केले होते. काही वेळानंतर त्यांना एक मेसेज आला की त्यांच्या ऑर्डरची डिलिव्हरी सस्पेंड करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन शॉपिंग, पेमेंट्स आणि होम डिलिव्हरी सेवांमुळे जीवन खूप सोयीस्कर झालं आहे. पण याच सोयींचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. एका चुकीच्या क्लिकमुळे तुमच्या खात्यातून हजारो रुपये गायब होऊ शकतात. अशाच एका प्रकाराचा अनुभव एका महिलेला आला.
मधुलिका शर्मा यांनी एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 6,000 रुपयांचे शूज ऑर्डर केले होते. काही वेळानंतर त्यांना एक मेसेज आला की त्यांच्या ऑर्डरची डिलिव्हरी सस्पेंड करण्यात आली आहे, कारण ऍड्रेसमध्ये हाऊस नंबर दिला नव्हता.
हा मेसेज वेगवेगळ्या नंबरवरून येत राहिला. त्यामुळे त्यांनी तो खरा समजून मेसेजमधील लिंक ओपन केली. ही लिंक त्यांना dhlino.cc.in नावाच्या बनावट वेबसाईटवर घेऊन गेली. त्यांनी डिटेल्स टाकल्या आणि त्याच क्षणी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल 51,700 रुपये उडाले.
advertisement
महिलेने हा प्रकार तात्काळ बँक आणि संबंधित संस्थांना कळवला. मात्र, बँकेनेही त्या रकमेची जबाबदारी नाकारली आणि उलट ती रक्कम त्यांच्या बिलामध्ये टाकली. त्यामुळे पीडित महिलेने आता बँक, RBI आणि इतर संस्थांकडे मदतीची मागणी केली आहे. (हा प्रकार 11 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदवला गेला आहे.)
हा प्रकार नोएडामध्ये रहाणाऱ्या एका महिलेसोबत घडला आहे. फ्रॉड मंडळी ही दिल्ली, नोएडा, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरातील लोकांना बहुतांशवेळा टार्गेट करतात. कारण या मोठ्या शहरातील लोकांकडे पैसे ही असतात आणि ऑनलाइन ऍक्टिविटीमध्ये या मोठ्या शहरातील लोक जास्त ऍक्टिव असतात, ज्यामुळे ठग्यांना त्यांना गंडवणं सोपं जातं.
advertisement
असे प्रकार टाळण्यासाठी काय कराल?
सायबर फ्रॉड टाळण्यासाठी काही साध्या गोष्टींचं नेहमी भान ठेवा. अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज किंवा मेल्स कधीही ओपन करू नका. संशयास्पद लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करण्याची चूक करू नका. डिलिव्हरी एजंट म्हणून कोणी माहिती मागत असल्यास नेहमी संबंधित कंपनीशी थेट संपर्क साधा. फसवणूक झाल्यास तात्काळ बँक आणि संबंधित एजन्सींना कळवा.
मराठी बातम्या/मनी/
Fraud : ऑनलाइन ऑर्डर केले 6000 रुपयांचे शुज, पत्ता अपडेट करायला ओपन केली लिंक आणि महिलेला घातला गंडा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement