सचिनला अगदी लहान वयातच ओळखलं होतं
बिहारचा लेफ्ट हँडेड बॅटर वैभव सुर्यवंशी देशासाठी काहीतरी खास करू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिलं की, कसं सिलेक्टर्सनी सचिनला अगदी लहान वयातच ओळखलं होतं. बारुचांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "जसं अनेक वर्षांपूर्वी सचिनला सिनियर टीममध्ये घेण्यात आलं होतं, तसंच या मुलालाही सिनियर टीममध्ये लगेच समाविष्ट करावं."
advertisement
जोफ्रा आर्चरला नेट्समध्ये धुतलं
वैभवला लगेच टीममध्ये घ्यायला हवं, कारण तो एका वेगळ्याच झोनमध्ये आहे. त्याला कमीतकमी इंडिया ए दौऱ्यावर तरी पाठवा. मी तुम्हाला सांगतो, सध्या इंडिया ए सोबत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग अटॅकसमोर त्याने दुहेरी सेंच्युरी केली असती. त्याने जोफ्रा आर्चरला नेट्समध्ये धुतले. जोफ्रा आर्चर जेव्हा नेट्समध्ये बॉलिंग करतो, तेव्हा तो एका राक्षसासारखा असतो. तो बॅटरला कधीही वॉर्म-अप बॉल टाकत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
बॅक फुटवर एक शॉट मारला अन्...
जोफ्रा आर्चर पूर्ण पॉवरने (power) बॉलिंग करतो. ॲशेस (Ashes) आधीच्या एका प्रॅक्टिस सेशनमध्ये जोफ्रा आर्चरने स्टीव्ह स्मिथच्या डोक्याला बॉल लागला होता. स्मिथला त्याच्यासमोर खेळणं जड जात होतं. त्या दिवसापासून जोफ्रा बॉलिंग करत असताना तो नेटच्या आत कधीच गेला नाही. वैभवला तो बॉलिंग करत असताना मला भीती वाटत होती आणि या मुलाने बॅक फुटवर एक शॉट मारला, जो थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. सर्व कोचिंग स्टाफ, जोफ्रासुद्धा आश्चर्यचकित झाले होते, असं जुबिन बारुचा यांनी सांगितलं.
वैभवला टीम इंडियामध्ये संधी मिळणार?
दरम्यान, मास्टर ब्लास्टरने 1989 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध डेब्यू (debut) केला होता. सध्या 14 वर्षांचा असलेला सूर्यवंशी सध्या अंडर-19 टीमकडून खेळत असून, त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौराही केला आहे, पण त्याला अजून इंडिया ए टीममध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे वैभवला आता संधी कधी मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.