सामना संपल्यानंतर, जोफ्रा आर्चरची 12 वर्षे जुनी सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली. ही पोस्ट ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथबद्दल आहे, त्यामुळेजोफ्रा आर्चरला पुन्हा एकदा क्रिकेटचा नोस्ट्रेडॅमस म्हटले गेले आहे. 12 वर्षांपूर्वी आर्चरने स्मिथबद्दल जे पोस्ट केले होते ते पूर्णपणे बरोबर ठरलं आहे.
21 मार्च 2013 रोजी जोफ्रा आर्चरने त्याच्या जुन्या हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले होते, 'स्टीव्ह स्मिथने 9 बॉलमध्ये 23 रन." आर्चरने हे पोस्ट केले तेव्हा तो काय विचार करत होता हे माहित नाही, पण 12 वर्षांनंतर, 7 डिसेंबर 2025 रोजी, स्टीव्ह स्मिथ इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ऍशेस कसोटीत 9 बॉलमध्ये 23 रन करत नाबाद राहिला. स्मिथने संघासाठी विजयी शॉट मारला, म्हणूनच जोफ्रा आर्चर सोशल मीडियावर चर्चेत आहे.
advertisement
सोशल मीडियावर आर्चरची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आर्चर स्वतः याला भाकित मानत नाही, त्याने अनेक वेळा सांगितले आहे की त्याला अशा पोस्ट करण्याची सवय आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीत जोफ्रा आर्चरची कामगिरी खूपच खराब होती. आर्चरने दोन्ही डावात फक्त एकच बळी मिळवला. आर्चरच्या बॉलिंगच्या कामगिरीनेही इंग्लंडच्या पराभवाला हातभार लावला. प्रथम बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडने 334 रन केल्या. प्रत्युत्तरादाखल, ऑस्ट्रेलियाने 511 रन काढल्या, त्यामुळे त्यांना 177 रनची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा 241 रनवर ऑलआऊट झाला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 65 रनचं आव्हान मिळालं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने मॅचच्या चौथ्या दिवशी 2 विकेट गमावून पार केलं.
