मक्याच्या दरात घट
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.00 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 272 क्विंटल इतकी झाली. आज राज्यातील फक्त 2 ठिकाणी मक्याची आवक झाली. यापैकी छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये 214 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1300 ते जास्तीत जास्त 1600 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 58 क्विंटल मक्यास सर्वसाधारण 1500 ते 1660 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारच्या तुलनेत मक्याच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.
advertisement
Harbara Disease : हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
कांदाही घसरला
राज्याच्या मार्केटमध्ये 24 हजार 634 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 13 हजार 623 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 575 ते 1475 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच पुणे चिंचवड मार्केटमध्ये आवक झालेल्या 7820 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1000 ते 2000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजारभावाच्या तुलनेत कांद्याच्या दरात देखील घट झालेली दिसून येते आहे.
सोयाबीनच्या दरातही घट
राज्याच्या मार्केटमध्ये 705 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. बुलढाणा मार्केटमध्ये सर्वाधिक 300 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. लातूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 158 क्विंटल सोयाबीनला 4655 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजारभावाच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात काहीशी घट बघायला मिळत आहे.





