Krishi Market: कांदा, मक्याचे दर पुन्हा घसरले, रविवारी सोयाबीनला किती मिळाला भाव?

Last Updated:

Krishi Market: 7 डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख कृषी मार्केटमध्ये शेतीमालाची आवक कमी राहिली. कांदा, मका आणि सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊ.

+
कांदा,

कांदा, मक्याच्या दरात पुन्हा घट, सोयाबीनला किती मिळाला भाव? रविवारचे बाजारभाव

अमरावती: राज्यातील कृषी मार्केटमध्ये शेतीमालाच्या दरांत सातत्याने चढ-उतार होत असतात. 7 डिसेंबर रोजी राज्यातील सर्वच कृषी मार्केटमध्ये शेतमालाची आवक कमी झाली. त्यातील सोयाबीन, कांदा आणि मका या महत्त्वाच्या तीन शेतमालांची आवक किती झाली? आणि भाव किती मिळाला? याबाबत माहिती जाणून घेऊ.
मक्याच्या दरात घट 
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.00 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 272 क्विंटल इतकी झाली. आज राज्यातील फक्त 2 ठिकाणी मक्याची आवक झाली. यापैकी छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये 214 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1300 ते जास्तीत जास्त 1600 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 58 क्विंटल मक्यास सर्वसाधारण 1500 ते 1660 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारच्या तुलनेत मक्याच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.
advertisement
कांदाही घसरला
राज्याच्या मार्केटमध्ये 24 हजार 634 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 13 हजार 623 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 575 ते 1475 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच पुणे चिंचवड मार्केटमध्ये आवक झालेल्या 7820 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1000 ते 2000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजारभावाच्या तुलनेत कांद्याच्या दरात देखील घट झालेली दिसून येते आहे.
advertisement
सोयाबीनच्या दरातही घट
राज्याच्या मार्केटमध्ये 705 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. बुलढाणा मार्केटमध्ये सर्वाधिक 300 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. लातूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 158 क्विंटल सोयाबीनला 4655 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजारभावाच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात काहीशी घट बघायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Krishi Market: कांदा, मक्याचे दर पुन्हा घसरले, रविवारी सोयाबीनला किती मिळाला भाव?
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement