टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या स्थानावर
आशिया कपच्या ग्रुप 'अ' मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ आहेत. भारताने पहिल्या मॅचमध्ये युएईचा ९ विकेट्सनी पराभव केला होता, तर पाकिस्तानने ओमानवर ९३ धावांनी विजय मिळवला. दोन्ही संघांनी एक-एक मॅच जिंकल्याने प्रत्येकाकडे २ गुण आहेत. मात्र, उत्कृष्ट नेट रनरेटमुळे टीम इंडिया सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
advertisement
मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो...
आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचपूर्वी दोन्ही संघांनी आपापल्या ग्रुपमधील पहिले सामने जिंकले आहेत. ग्रुप 'अ' मध्ये दोन्ही संघांचे २-२ गुण आहेत, भारताने आपल्या पहिल्या मॅचमध्ये युएईचा ९ विकेट्सने पराभव केला होता, तर पाकिस्तानने ओमानवर ९३ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल, तो ग्रुपमध्ये अव्वल स्थान टिकवून ठेवेल.
'ग्रुप बी'मध्ये कोण टॉपवर?
'ग्रुप बी'च्या गुणतालिकेनुसार, ग्रुप 'ब' मध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी १ मॅच जिंकली आहे, तर बांगलादेशने २ मॅचमधून १ विजय मिळवला आहे. हाँगकाँगने खेळलेल्या दोन्ही मॅचमध्ये पराभव स्वीकारला आहे. ग्रुप 'अ' मध्ये भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी १ मॅच जिंकली असून, ओमान आणि युएईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सुपर 4 मध्ये कोण कोण पोहोचणार?
दरम्यान, आजच्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल, तो ग्रुप 'अ' मध्ये आपले अव्वल स्थान निश्चित करेल आणि 'सुपर-४' फेरीच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकेल. त्यामुळे केवळ प्रतिष्ठेचा सामनाच नाही, तर स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठीही हा विजय महत्त्वाचा असेल.