काय म्हणाले सितांशू कोटक?
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या सरकारच्या निर्णयाचं बीसीसीआयने समर्थन केलं आहे, तेव्हापासून टीमचं लक्ष पूर्णपणे क्रिकेटवर आहे, असं सितांशू कोटक म्हणाले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होत आहे.
advertisement
'बीसीसीआयने सरकारच्या निर्णयाशी सहमत असल्याचे सांगितल्यापासून, आमचे लक्ष नेहमीच सामन्यावर राहिले आहे. हा भारत-पाकिस्तान सामना आहे, त्यामुळे तो मनोरंजक असेल. भारत-पाकिस्तान यांच्यात नेहमीच स्पर्धात्मक मॅच होते', असं सितांशू कोटक म्हणाले आहेत.
काश्मीर हल्ल्यानंतरचा सामना का?
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या तणावामुळे क्रिकेटपटू खरोखरच प्रभावित होऊ शकतात का? असा प्रश्नही सितांशू कोटक यांना विचारण्यात आला. 'खेळाडू मैदानावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या मनात दुसरे काहीही नाही', असं उत्तर कोटक यांनी दिलं. काश्मीरमधील हल्ल्यानंतर, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी मागणी तीव्र झाली आहे.