TRENDING:

Asia Cup Super 4 scenario : ग्रुप B मध्ये अफगाणिस्तानसाठी 'करो या मरो', श्रीलंकेला 11.4 ओव्हरमध्येच जिंकावा लागेल सामना, पाहा रोमांचक समीकरण

Last Updated:

Asia Cup Super 4 Qualification scenario : अफगाणिस्तानने श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव केला तर समीकरणं बदलू शकतात. जर श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवलं तर परिस्थिती वेगळी असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Asia Cup Group B scenario : एशिया कपमध्ये 'ग्रुप बी' च्या 'सुपर फोर' फेरीतील दोन जागांसाठी श्रीलंका (Sri Lanka), बांगलादेश (Bangladesh) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) या संघांमध्ये चुरस सुरू आहे. बांगलादेशने त्यांचे तीनही सामने खेळले आहेत आणि त्यांच्याकडे चार पॉईंट्स आहेत. तर श्रीलंकेने दोन मॅच जिंकल्या आहेत आणि त्यांच्याकडेही चार पॉईंट्स आहेत. अफगाणिस्तानचा एक विजय आणि एका पराभवासह दोन पॉईंट्स आहेत. त्यांचा श्रीलंकेसोबत एक महत्त्वाचा सामना बाकी आहे.
Asia Cup Super 4 Qualification scenario
Asia Cup Super 4 Qualification scenario
advertisement

'सुपर फोर'चं गणित अवघड

या ग्रुपमधील 'सुपर फोर'चं गणित अवघड झालं आहे, पण जर अफगाणिस्तानने श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव केला तर समीकरणं बदलू शकतात. जर श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवलं तर श्रीलंकेकडे सहा पॉईंट्स होतील आणि ते 'सुपर फोर'मध्ये जातील. बांगलादेशचे चार पॉईंट्स असल्यामुळे ते देखील पात्र ठरतील. जर अफगाणिस्तानने श्रीलंकेला हरवलं तर अशा परिस्थितीत श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांचे 4-4 पॉईंट्स होतील. मग 'नेट रन रेट' (NRR) नुसार 'सुपर फोर' मध्ये जाणारे दोन संघ ठरतील.

advertisement

अफगाणिस्तानसाठी 'करो या मरो'

सध्या अफगाणिस्तानचा 'नेट रन रेट' चांगला आहे. जर त्यांनी श्रीलंकेला हरवलं तर ते नक्कीच पात्र ठरतील. त्यामुळे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यापैकी एका संघाला बाहेर पडावे लागेल. बांगलादेशचा 'नेट रन रेट' सध्या -0.270 इतका कमी आहे तर दुसरीकडे श्रीलंकेचा 'नेट रन रेट' जास्त आहे. बांगलादेशच्या 'नेट रन रेट'पेक्षा कमी होण्यासाठी श्रीलंकेला अफगाणिस्तानविरुद्ध सुमारे 70 रन्सने किंवा 50 बॉल शिल्लक ठेवून पराभूत व्हावं लागेल.

advertisement

बांग्लादेश श्रीलंकेच्या भरोशावर

दरम्यान, श्रीलंकेचा नेट रनरेट सध्या +1.546 आहे. त्यामुळे श्रीलंका सेफ झोपमध्ये असल्याचं मानलं जातंय. अफगाणिस्तानने झिम्बाब्वे वगळता कोणत्याही संघाविरुद्ध 140 किंवा त्याहून अधिक रन्सचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकणं त्यांच्यासाठी मोठे आव्हान असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup Super 4 scenario : ग्रुप B मध्ये अफगाणिस्तानसाठी 'करो या मरो', श्रीलंकेला 11.4 ओव्हरमध्येच जिंकावा लागेल सामना, पाहा रोमांचक समीकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल