मोहसिन नक्वी हा पीसीबी प्रमुख आणि एसीसीचा अध्यक्ष आहे, तसंच तो पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्रीही आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी नक्वीने भारताविरोधात गरळ ओकली होती, त्यामुळे भारतीय टीमने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला. बीसीसीआयने नक्वीला वारंवार ट्रॉफी परत करण्याचा इशारा दिला आहे, याबद्दलचे मेलही बीसीसीआयने पाठवले आहेत. या मेलला नक्वीने रिप्लाय दिला आहे. '10 नोव्हेंबर रोजी यूएईमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा हेतू आहे. या कार्यक्रमादरम्यान आपण टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि भारतीय खेळाडूंना ट्रॉफी देऊ', असं उत्तर नक्वीने दिलं, पण बीसीसीआयने याला स्पष्टपणे नकार दिला आहे.
advertisement
ट्रॉफी चोरल्यानंतर नक्वी पळला
आशिया कप 2025 दरम्यान भारताने पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारले. पहलगाम हल्ल्याविरुद्ध भारताने कडक भूमिका घेतली आणि सुपर फोर सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी सभ्यता आणि शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, बंदुकीच्या सेलिब्रेशनपासून ते विमान अपघातापर्यंत अपमानजनक कृत्ये केली. प्रत्युत्तरादाखल, अंतिम सामना जिंकल्यानंतर भारताने एसीसी प्रमुख मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी एक तास ट्रॉफी धरून स्टेजवर उभे राहिला, पण सादरीकरण समारंभाला कोणताही भारतीय खेळाडू उपस्थित राहिला नाही. शेवटी, नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेला.
