IND vs AUS : भारताने डिएलएस मेथडनूसार दिलेले 131 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने टी20 स्टाईलमध्ये पुर्ण करत हा सामना 7 विकेटसने जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार कर्णधार मिचेल मार्श ठरला आहे. कारण मार्शने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. खरं तर भारताच्या डावा दरम्यान पावसाने अनेकदा सामन्यात खोडा घातला तर ऑस्ट्रेलिया दरम्यान पाऊस पडला नाही, याचाच फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
भारताने डीएलएस मेथडनूसार दिलेल्या 131 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज ट्रॅविस हेड अवघ्या 8 धावांवर बाद झाली होती.त्यापाठोपाठ मॅथ्यू शॉर्ट देखील 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर चांगल्या लयीत असलेला जोश फिलिप्स 37 धावांवर बाद झाला.
कर्णघार आणि सलामीवीर मिचेल मार्शमे चांगली खेळी केली. मार्शने 46 धावांची नाबाद खेळी केली.त्याच्यासोबत मॅट रेन्शो 21 धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 21.1 ओव्हरमध्ये हे लक्ष्य सहज गाठून 7 विकेटसने हा सामना जिंकला.
भारताचा डाव
प्रथम फलंदाजी करताना भारताची सूरूवात खूपच खराब झाली. टीम इंडियाकडून सर्वाधिक 38 धावा या केएल राहुलने केल्या.त्याच्या पाठोपाठ अक्षर पटेलने 31 धावांची खेळी केली.या दोन खेळाडू व्यतिरीक्त शेवटच्या क्षणी नितेश रेड्डीने केलेल्या नाबाद 19 धावा केल्या. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन गगनचुंबी षटकार लगावले. यामुळेच भारत 26 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 136 धावाच करू शकली.
या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने अवघ्या 8 धावा केल्या. तर विराट कोहली शुन्यावर बाद झाला आणि कर्णधार शुभमन गिल 10 धावा करून बाद झाला. भारताच्या या डावानंतर अनेकदा पावसामुळे खेळ थांबला. त्यामुळे भारताला धावा करताना प्रचंड अडचणी आल्या होत्या. तरी देखील भारत 136 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड,मिचेल ओवेन आणि मॅथ्यू कुहनेमन प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर मिचेल मार्श आणि नथन इलिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.