अन् इंग्लंडच्या इनिंगचा शेवट
चित्ता जसं शिकारीसाठी झडप घालतो, तशीच झडप लाबुशेनने कॅच घेताना घातली. इंग्लंडच्या डावातील शेवटच्या क्षणी जोफ्रा आर्चर 38 धावांवर आउट झाला आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यासाठी मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschagne) 'सुपरमॅन' कॅच घेतला. लाबुशेनने बाउंड्री लाइनजवळ 'सुपरमॅन' स्टाईलमध्ये एक शानदार कॅच पकडून आर्चर आणि इंग्लंडच्या इनिंगचा शेवट केला.
advertisement
योग्य वेळी जम्प अन् कॅच पकडला
हा अविश्वसनीय कॅच इंग्लंडच्या इनिंगच्या 77 व्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. ब्रेंडन डोगेट च्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आर्चरने 'शॉर्ट आर्म पुल' मारण्याचा प्रयत्न केला. बॉलचा बॅटशी चांगला संपर्क झाला होता, मात्र बाउंड्रीवर उभ्या असलेल्या मार्नस लाबुशेनने गजबची फुर्ती दाखवत योग्य वेळी जम्प घेऊन हा उत्कृष्ट कॅच पूर्ण केला. त्यांच्या या कॅचचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
पाहा Video
जो रूटचं शानदार शतक
दरम्यान, मॅचच्या पहिल्या दिवसाचा विचार केल्यास, कर्णधार जो रूटच्या शानदार शतकामुळे इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सन्मानजनक स्कोर उभारण्यात यशस्वी झाला. टॉस (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती, कारण बेन डकेट (0) आणि ओली पोप (0) खाते न उघडताच पॅव्हेलियन (Pavilion) परतले होते.
