TRENDING:

भारताविरुद्धच्या T20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियातून आली बॅड न्यूज, 36 वर्षाच्या म्हाताऱ्या खेळाडूला केलं कॅप्टन! पॅट कमिन्सची सुट्टी

Last Updated:

Ashes Pat Cummins Ruled Out : पहिल्या कसोटीला एका महिन्यापेक्षा कमी अवधी असताना, कमिन्सने अद्याप बॉलिंग सुरू केलेली नाही. त्याला संघात परतण्यासाठी किमान फोर आठवडे बॉलिंग प्रॅक्टिसची गरज होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Australia vs England, Ashes 2025 Series : कसोटी क्रिकेटमधील सर्वात रोमांचक अशा ऍशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स बाहेर झाल्याची बातमी क्रिकेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने जाहीर केली आहे. पाठीच्या स्ट्रेस इंजरीमुळे पॅट कमिन्स पर्थ येथे होणाऱ्या मालिकेच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. कमिन्सच्या अनुपस्थितीत 36 वर्षाच्या अनुभवी खेळाडू संघाचं कर्णधारपद सांभाळेल. पॅट कमिन्स दुखापतीतून लवकर बरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Ashes Pat Cummins Ruled Out
Ashes Pat Cummins Ruled Out
advertisement

पॅट वेळेत फिट होण्याची शक्यता 

कमिन्सने रनिंग सुरू केले आहे आणि लवकरच तो बॉलिंगला परतण्याची अपेक्षा आहे, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं आहे. पहिल्या कसोटीला एका महिन्यापेक्षा कमी अवधी असताना, कमिन्सने अद्याप बॉलिंग सुरू केलेली नाही. त्याला संघात परतण्यासाठी किमान फोर आठवडे बॉलिंग प्रॅक्टिसची गरज होती. त्यामुळे, आता डिसेंबर 4 पासून सुरू होणाऱ्या ब्रिस्बेन येथील दुसऱ्या डे-नाईट टेस्ट मॅचसाठी तो वेळेत फिट होण्याची शक्यता आहे. ऍशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी स्टिव्ह स्मिथला कॅप्टन करण्यात आलं आहे.

advertisement

स्कॉट बोलंडला संधी मिळण्याची शक्यता

कर्णधारपद आणि आघाडीचा फास्ट बॉलर म्हणून कमिन्सचे बाहेर होणे ऑस्ट्रेलियासाठी मोठा झटका आहे. मात्र, कोच अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी यापूर्वीच कमिन्सच्या सहभागाबद्दल साशंकता व्यक्त केली होती. कमिन्सच्या जागी बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये स्कॉट बोलंडला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

बॅक-टू-बॅक टेस्ट मॅचेस

ऍडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथील बॅक-टू-बॅक टेस्ट मॅचेसदरम्यान फास्ट बॉलर्सना रोटेट करणं आवश्यक असल्याने, दुसऱ्या किंवा तिसऱ्या टेस्ट मॅचपासून कमिन्स परतल्यास संघासाठी फायदाच होईल, यात शंका नाही. कमिन्सच्या बॉलिंगची जागा घेण्यासाठी स्कॉट बोलंड हा दुसरा संभाव्य पर्याय आहे.

advertisement

मॅचमधून विश्रांती घेण्याची अपेक्षा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

दरम्यान, बोलंडचा घरच्या मैदानावर बॉलने 12.63 चा प्रभावी ॲव्हरेज आहे, ज्यामुळे तो पर्थमधील पहिल्या टेस्टसाठी आदर्श रिप्लेसमेंट ठरतो. दरम्यान, ऍडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे कमी वेळेत होणाऱ्या टेस्ट मॅचमुळे ऑस्ट्रेलियाला संपूर्ण मालिकेत एकाच बॉलिंग अटॅकसह खेळणे शक्य नव्हते. त्यामुळे, दुसऱ्या किंवा तिसऱ्या टेस्टपासून कमिन्सने कमबॅक केल्यास संघाला आवश्यक ब्रेक्स आणि रोटेशन मिळेल. बोलंड व्हिक्टोरिया आणि तस्मानिया यांच्यातील मॅचमधून विश्रांती घेण्याची अपेक्षा आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारताविरुद्धच्या T20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियातून आली बॅड न्यूज, 36 वर्षाच्या म्हाताऱ्या खेळाडूला केलं कॅप्टन! पॅट कमिन्सची सुट्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल