सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काय घडलं?
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हॉटेलजवळून कॅफेकडे पायी जात असताना, खजराना येथील अकील पिता इम्तियाज शेख नावाच्या बाईकस्वाराने त्यांचा पाठलाग केला. आरोपीने खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून पळ काढला. या घटनेमुळे घाबरलेल्या खेळाडूंनी त्वरित त्यांचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अकीलविरुद्ध बीएनएसच्या कलम 74 आणि 78 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
advertisement
दोन्ही खेळाडू घाबरल्या, रडू लागल्या
आरोपी अकील जेव्हा खेळाडूंची छेडछाड करत होता, त्याचवेळी कारने जात असलेल्या एका व्यक्तीने ही घटना पाहिली आणि तातडीने खेळाडूंच्या मदतीसाठी धाव घेतली. या घटनेमुळे त्या दोन्ही खेळाडू खूप घाबरल्या होत्या आणि रडू लागल्या होत्या. कारमधील या तरुणाने त्यांना धीर दिला. त्याने आरोपीच्या बाईकचा नंबरही नोंदवून घेतला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. आरोपीला पकडण्यात हा नंबर अत्यंत महत्त्वाचा क्लू ठरला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
आरोपी अकीलवर अनेक गुन्हे दाख
दरम्यान, आरोपी अकीलवर अनेक गुन्हे दाखल आहेत. छेडछाड, हल्ला, लूट, दरोडा यांसारखे 12 केसेस यापूर्वीच दाखल आहेत. यापूर्वी त्याने उज्जैनमध्ये पोलीस कोठडीत असताना जवानांची रायफल हिसकावून घेण्याचा आणि हत्येचा प्रयत्नही केला आहे. विशेष म्हणजे, 10 वर्षांची शिक्षा भोगून तो केवळ 4 महिन्यांपूर्वीच भैरवगड तुरुंगातून बाहेर आला होता. त्यामुळे आता भारताची इज्जत घालवलेल्या अकीलला काय शिक्षा मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
